शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मतदारनोंदणी मोहिमेला १२ हजारांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:19 IST

महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेला गेल्या महिनाभरात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याबाबतचा आढावा गुरुवारी सायंकाळी

ठाणे : महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेला गेल्या महिनाभरात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याबाबतचा आढावा गुरुवारी सायंकाळी गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात घेण्यात आला. या वेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदारनोंदणीचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध गायक अनिरु द्ध जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होेता. भारतासारख्या लोकशाही देशात मतदानाची टक्केवारी कमी असते. लोकशाही प्रक्रियेद्वारे लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचे काम मतदार करतात. त्यामुळे पात्र व्यक्तींनी मतदारयादीत नाव नोंदवून मतदान केलेच पाहिजे, असे मत आयुक्त पाटील यांनी व्यक्त केले. महिनाभर सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे दीड लाख फॉर्मचे वाटप झाले असून १० ते १२ हजार मतदारांची नावनोंदणी झाली आहे. हा आकडा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाविद्यालयांत कॅम्पस अ‍ॅम्बॅसेडर नेमल्याने विद्यार्थी नावनोंदणीचा उपक्र म यशस्वी ठरत आहे, असे कल्याणकर म्हणाले. गायक अनिरुद्ध याने आपण नागपूरहून मुंबईला स्थायिक झालो, तेव्हा प्रथम मतदारयादीत नाव नोंदवून ओळखपत्र बनवून घेतल्याचे सांगितले. मतदारनोंदणी मोहिमेंतर्गत कार्य करणारे बांदोडकर महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश माळी यावेळी उपस्थित होते.