शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

‘सावरकरांवरील आक्षेपांचे निराकरण करावे लागणे दुर्दैवी’

By admin | Updated: April 24, 2017 02:12 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे.

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडणे हे आपले दुर्भाग्य आहे. इतर कोणत्याही देशात स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या थोर व्यक्तिंवर आक्षेप आणि निराकरण असे कार्यक्रम झालेले ऐकले आहेत का? मात्र आपण स्वा.सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण या विषयावर परिसंवाद घेण्यात शक्ती दवडतोय, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल, असे स्पष्ट मत डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात रविवारी ‘सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १९११ ते १९४८ या कालावधीत सावरकरांनी मांडलेले विचार, भूमिका, कृती यावर आक्षेप घेतले जातात. यातील काही आक्षेप ते जिवंत असतानाच घेतले होते आणि विशेष म्हणजे त्याचे निराकरण स्वत: सावरकरांनी केले. स्वातंत्र्य, हिंदुत्व , विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद या सावरकरांच्या जीवननिष्ठा तर भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श लक्षात घेतल्यास त्यांच्यावर आक्षेप घेणे किती निराधार, कपोलकल्पित आणि हास्यास्पद आहे, हे लक्षात येते. मुख्य म्हणजे स्वा.सावरकरांवर आक्षेप घेणारी मंडळी स्वत: प्रामाणिक आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे गोडबोले म्हणाले. सावरकर झाले नसते तर पाकिस्तानचा आकार आहे त्यापेक्षा मोठा झाला असता आणि अखंड पाकिस्तानच्या प्रक्रियेला खूप वेग आला असता. ब्रिटीश येथून गेल्यावर ती जागा मुस्लिम घेतील ही भीती लक्षात घेऊन सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे शब्द वापरून भलमोठं तत्वज्ञान उभ केलं, असे प्रतिपादन अरविंद कुलकर्णी यांनी केले. बंदीवासात असलेल्या सावरकरांवर झालेल्या अनेक आक्षेपांचे प्रा. गजानन नेरकर यांनी निराकरण केले. (प्रतिनिधी)