शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या देवचंद नगर परिसरातील रहिवाश्यांचा मतदान आणि नेत्यांवर बहिष्काराचा इशारा

By धीरज परब | Updated: May 25, 2025 23:41 IST

भाईंदरच्या देवचंद नगर भागातील सुमारे २७ जुन्या इमारतींच्या रहिवाश्यांनी मिळून रविवारी जाहीर बैठक घेतली. बहुतांश इमारती ग्रामपंचायत काळा पासूनचा असून काही इमारतींना अतिधोकादायक ठरवण्यात आले आहे.

धीरज परब

मीरारोड- भाईंदर पश्चिमेच्या सती राणी मार्ग - देवचंद नगर भागातील जुन्या इमारतीतील रहिवाश्यांनी इमारतींच्या पुनर्विकाससाठी क्लस्टर हटवून आम्हाला आमच्या इमारती विकसित करू द्या. अन्यथा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानावर तसेच राजकीय नेत्यांवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. 

भाईंदरच्या देवचंद नगर भागातील सुमारे २७ जुन्या इमारतींच्या रहिवाश्यांनी मिळून रविवारी जाहीर बैठक घेतली. बहुतांश इमारती ग्रामपंचायत काळा पासूनचा असून काही इमारतींना अतिधोकादायक ठरवण्यात आले आहे. सदर परिसर क्लस्टर योजने खाली असून गेल्या २ वर्षात काहीच झाले नाही. लोकांना स्वतःच्या इमारती विकसित करता येत नाहीत. क्लस्टर खाली आमची मालकी जमीन ९९ वर्षांच्या लीज खाली जाणार, क्षेत्र मर्यादित मिळणार, घर १५ वर्ष विकत येणार नाही आदी कारणे सांगत लोकांनी क्लस्टर योजनेला विरोध केला. 

सुमारे १५०० ते २ हजार कुटुंब आहेत. पालिका आता इमारती धोकादायक ठरवत आहेत. कोणाचे घर तुटले तर भाजपा किंवा शिवसेनेचे नेते आम्हाला घर देणार नाहीत . शहरातील नेते हे बिल्डर आहेत . नेते इमारती पडून लोकांचे जीव जाण्याची वाट बघत आहेत. येथील नेत्यांवर आमचा भरोसा नाही असा संताप काहींनी व्यक्त केला. 

तत्कालीन आमदार गीता जैन आणि विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना भेटून देखील त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. मेहतांची थेट मुख्यमंत्री यांच्याशी जवळची ओळख आहे. मग आमच्या साठी निर्णय घ्या. मेहतांनी विधिमंडळात आवाज उठवावा अशी मागणी लोकांनी केली.  तुम्हाला मतं लोकांच्या हितासाठी दिली. माजी नगरसेवकांनी पण विरोध केला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू. नेत्यांना आमच्या परिसरात घुसू देणार नाही असा इशारा लोकांनी दिला. 

२०२२ मध्ये ५ इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेत दिला होता. आता मात्र सदर क्षेत्र क्लस्टर खाली असल्याने बांधकाम परवानगी देता येणार नाही असे प्रशासन सांगते. दुसरीकडे आमच्या इमारती धोकादायक ठरवून त्या रिकामी करा सांगत आहेत. इमारती तोडून आम्हाला रस्त्यावर आणायचे आहे असा आरोप लोकांनी केला.