शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा 

By सदानंद नाईक | Updated: November 1, 2023 19:01 IST

महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला.

उल्हासनगर : महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. वर्षानुवर्षे राहत असलेली जागा सरकारची झाली कशी? त्याच सर्वेतील इतर अवैध बांधकामाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून महापालिका कारभारावर टीका केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील दुर्गापाडा भागात ३० ते ४० घरे आदिवासी समाजाची असून वर्षानुवर्ष याच जागेवर राहतात. आदिवासी वस्तीच्या बाजूच्या खुल्या जागेवर महापालिकेने जलकुंभ उभारण्याला मंजुरी देऊन काम सुरू केले. मात्र स्थानिक आदिवासी समाजाने जागेवर हक्क सांगितल्याने, जलकुंभाचे काम वादात सापडले आहे. याच सर्वेतील जागेवर स्थानिक राजकीय नेते व महापालिका अधिकारी यांनी संगनमत करून अवैध बांधकामे करीत आहेत. असा आरोप केला. मात्र आम्ही उदरनिर्वाहसाठी कर्ज काढून दुकानासाठी एखादी रूम बांधलीतर, त्यावर महापालिका अधिकारी स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून पाडकाम कारवाई करतात. आमच्या बांधकामावर पाडकाम कारवाई मग खुल्या जागेवर बांधण्यात आलेल्या शेकडो अवैध बांधकामाला महापालिकेचे अभय का? असा थेट प्रश्न अधिवासी महिला करीत आहेत.

 महापालिकेच्या ७० टक्के पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण झाले असून जागेला सोन्याचे दिवस आल्याने, आदिवासी समाजाची जागा हडप करण्याचे कटकारस्थान स्थानिक राजकीय नेते हे महापालिका अधिकारी याना हाताशी धरून करीत आहेत. असा टाहो महापालिका प्रवेशद्वारावर महिलांनी फोडला आहे. 

 जागा शासनाची आदिवासी समाजाने मोर्चा काढून महापालिकेला निवेदन दिले. मात्र जागेचा सातबारा नसून जागा शासनाची दाखवीत आहेत. अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली. याबाबत अधिक तपास करून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. 

खुली जागा कोणाची महापालिकेत दुर्गापाडा, जुने अंबरनाथ गावठाण भाग व गायकवाड पाडा परिसर महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यावर, शासनाची जागा असलेल्या खुल्या जागेला सोन्याचा भाव आला. यातूनच महापालिका अधीकारी, भूमाफिया व स्थानिक नेत्यांनी अवैध बांधकामे केली. मात्र आदिवासी समाजाची आर्थिक क्षमता नसल्याने खुल्या जागेवर बांधकाम केले नाही. त्या जागेवर जलकुंभ उभारण्याचा हट्टाहास महापालिका करीत असल्याचे आदिवासी बांधवाची म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर