शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत विविध विभाग खात्याचा खांदेपालट 

By सदानंद नाईक | Updated: April 9, 2025 19:46 IST

चार उपायुक्त व चार सहायक आयुक्तवर जबाबदारी

सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका कारभारात पारदर्शकता, नियमितता व काम जलद होण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी विविध विभागाच्या खात्याचे वाटप चार उपायुक्त व चार सहायक आयुक्त यामध्ये केले. खाते वाटपामुळे काम जलद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर महापालिकेला शासनाने प्रतिनियुक्तीवर ऐक अतिरिक्त आयुक्त, चार उपायुक्त व चार सहायक आयुक्त आदिची नियुक्ती केली. या अधिकाऱ्यामुळे महापालिका कामकाज पारदर्शक व जलद होण्याची आशा आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त यांना प्रशासकीय कामकाजाची विभागणी केली. लिपिक वर्गाच्या कर्मचाऱ्याकडे वर्ग-१ व २ च्या पदासह महत्वाच्या विभागाचा पदभार यापूर्वी दिला होता. अश्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठविले. आजही अनेक कर्मचाऱ्याकडे महत्वाचे विभाग कायम आहे. 

उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, मालमत्ता कर, उद्यान, वृक्ष प्राधिकरण, मालमत्ता, सार्वजनिक आरोग्य व माहिती व तंत्रज्ञान हे विभाग सोपविले आहे. उपायुक्त डॉ दीपाली चौगले यांच्याकडे सामान्य प्रशासन, अभिलेख, विधी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, अग्निशमन व भांडार विभाग आदी विभागाचा पदभार दिला. 

उपायुक्त अनंत जवादवार यांच्याकडे पाणीपुरवठा, दिव्यांग, महिला व बालकल्याण, राष्ट्रीय आपत्ती आदी विभाग आहे.  उपायुक्त डॉ विजय खेडकर यांच्याकडे वैधकीय आरोग्य, वाहन व परिवहन विभाग, आधार केंद्र, जनगणना, पर्यावरण, बाजार परवाना, क्रीडा व सांस्कृतिक आदी विभागाचा पदभार सोपविला आहे.

 उपयुक्ताकडे सोपाविण्यात आलेले विभागाचा पतीपदभार अजय साबळे, राहुल लोंढे, मयुरी कदम व विशाल कदम यांच्याकडे सोपवीला आहे. तर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे नगररचनाकार, अनधिकृत बांधकामे निष्काशीत करणे व महापालिका सचिव आदी पदाचा पदभार दिला. तर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली थेट लेखा व लेखा परीक्षण विभाग ठेवला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर