शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पाेलिस अधिकाऱ्यांचे खांदेपालट; चार उपायुक्तांसह नउ सहायक आयुक्त

By जितेंद्र कालेकर | Updated: February 1, 2024 23:03 IST

विशेष शाखेच्या श्रीकांत पराेपकारींना भिवंडी तर मुख्यालयाच्या सुभाष बुरसेंना मिळाले ठाणे

ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरु आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह १७ निरीक्षकांची आयुक्तालयाच्या बाहेर बदली झाली आहे. त्यापाठाेपाठ आता ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पाेलिस उपायुक्त श्रीकांत पराेपकारी, ठाण्याचे गणेश गावडे, िभवंडीचे नवनाथ ढवळे आणि मुख्यालयाचे सुभाषचंद्र बुरसे या चार उपायुक्तांसह नउ सहाय्यक आयुक्त आणि ३४ निरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांच्या आयुक्तालयांतर्गत पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी बदल्या करुन खांदेपालट केले आहे.पाेलिस आयुक्त डुंबरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांना विशेष शाखेत आणण्यात आले आहे. तर विशेष शाखेचे उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांना भिवडी परिमंडळ २ मध्ये संधी मिळाली आहे. भिवंडीच्या नवनाथ ढवळे यांची मुख्यालय २ मध्ये बदली झाली आहे. तर मुख्यालयाचे सुभाषचंद्र बुरसे यांना ठाणे परिमंडळ १ मध्ये संधी देण्यात आली आहे.

त्याच बरोबर भिवंडी पूर्व विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांची विशेष शाखा २ येथे तर वर्तकनगर विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखेत, कळवा विभागाचे विजयसिंह भोसले यांची ठाणे शहर वाहतूक शाखेत , आर्थिक गुन्हे शाखेचे उत्तम कोळेकर यांची कळवा विभागात बदली झाली आहे. विशेष शाखा २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल वाघमारे यांची भिवंडी वाहतूक शाखेत, भिवंडी वाहतूक शाखेचे मंदार जवळे यांची वर्तकनगर विभागात बदली झाली आहे. नियंत्रण कक्षाच्या संजय साबळे यांची कल्याण वाहतूक शाखेत, विशेष शाखा ३ चे सहायक आयुक्त सिद्धार्थ गाडे यांची भिवंडी पूर्व विभागात बदली झाली असून मुख्यालय १ च्या सहाय्यक आयुक्त ममता डिसोजा यांची विशेष शाखा ३ येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय, नाैपाडयाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांची वाहतूक शाखेत, कळव्याचे कन्हैया थाेरात आणि निवृत्ती काेल्हटकर यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. यासह आयुक्तालयातील ३४ निरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.