शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

 राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश

By अजित मांडके | Updated: September 26, 2023 12:18 IST

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो याला मिळाली संशोधनासाठी पाठ्यवृत्ती, देशभरातील १० सर्वोच्च शोध निबंधामध्ये झाली निवड  

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्ष एमबीबीएसमध्ये शिकणारा शर्विन कार्व्हालो याला संशोधनासाठी पाठ्यवृत्ती मिळाली असून देशभरातील १० सर्वोच्च शोधनिबंधामध्ये निवड झाली आहे.                                                       

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इंडियन कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स या राष्ट्रीय पातळीवरील बालरोग शास्त्राच्या सर्वोच्च संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयएपी - आयसीपी संशोधन पाठ्यवृत्ती २०२२ साठी देशभर स्पर्धा घेण्यात आली. एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यंदा सुमारे ७०० हून अधिक शोधनिबंध एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी सादर केले होते. त्यातून अतिशय उच्च आणि अवघड अशा काठिण्य पातळी असलेल्या निवड चाचणीतून अंतिम १० शोधनिबंध संशोधन पाठ्यवृत्तीसाठी निवडले जातात. त्यात, राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात तृतीय वर्ष एमबीबीएसमध्ये शिकणारा शर्विन कार्व्हालो याच्या शोधनिबंधाची निवड करण्यात आली आहे.

'नवजात अर्भकांच्या नाळेतील रक्ताच्या घटकांचा अर्भकांना होणाऱ्या संसर्गाच्या पूर्वलक्षी निदानासाठी होणारा उपयोग,' असे शर्विनच्या शोधनिबंधाचे शीर्षक आहे. या शोधनिबंधासाठी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहीत रोजेकर यांनी शर्विनला मार्गदर्शन केले. तसेच, विद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वाती घांघुर्डे, डॉ. सुनील जुनागडे, डॉ. जयेश पानोत, डॉ. जयनारायण सेनापती यांचेही त्यात योगदान होते. 

'आविष्कार'मध्येही झळकले विद्यार्थीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या 'आविष्कार' या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेतही राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील वत्सल जैन आणि शिवानी निरगुडकर या विद्यार्थ्यांना मेडीसीन आणि फार्मसी या गटात अनुक्रमे पहिले आणि दुसरे पारितोषिक मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी डॉ. मोहीत रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प पूर्ण केले. त्यांना डॉ. तुषार बागले, डॉ. रोहनकुमार हिरे, डॉ. राजेश्वर पाटे, डॉ. प्राची घोलप आणि डॉ. स्वाती घांघुर्डे या प्राध्यापकांचेही मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतर विद्यापीठ स्तरावरील संशोधन महोत्सवातही सहभाग घेतला होता