शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला आंदोलनात अडकवणार?, विनापरवानगी आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:26 IST

मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते...

भार्इंदर : मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते, अशा दावा करत रेल्वे सुरक्षा बलाने त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. या बेकायदा आंदोलनाच्या आधारे शिवसेनेला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्या पक्षाचा दावा आहे.एल्फि न्स्टन रोडच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर तशी घटना मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पुलावर होऊ नये, हा रेल्वे परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी शिवसेनेने आ. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी फेरीवाल्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केल्याचे सांगण्यात आले. परंतु रेल्वे स्थानक व पादचारी पुलावर फेरीवाले बसतच नसल्याचा दावा रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आला. उत्तर दिशेकडील पुलाच्या बाजुला फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेचा असल्याचा दावा संबंधित अधिकाºयांनी केला. फेरीवाले नसतानाही काही बोगस फेरीवाल्यांना तेथे आंदोलनापूर्वी बसविण्यात आल्याचा दावा रेल्वेच्या सुत्रांनी केला. त्यांनाच फेरीवाले भासवुन रेल्वेच्या हद्दीत विनापरवानगी आंदोलन छेडल्याचा दावाही सुरक्षा बलाने केला.शिवसेनेने भार्इंदर स्थानकातील पादचारी पुलावर घोषणाबाजी सुरु करुन आंदोलन छेडले. ते बेकायदा असून रोखण्याचा प्रयत्न करणाºया सुरक्षा बलाच्या अधिकाºयालाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. हा प्रकार काही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्याने सुरक्षा बलाने त्याचा सविस्तर अहवाल सोमवारीच वरिष्ठांकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवसेनेने मात्र या आंदोलनाची पूर्वकल्पना रेल्वे पोलिसांना दिल्याचा दावा केला. आंदोलनादरम्यान जवानांनी शिवसेनेच्या एका नगरसेवकासह तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांना काही वेळेतच सोडून देण्यात आले.रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयाशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत जवानांत संतापाचे वातावरण आहे. त्यामुले त्यांनी तातडीने या प्रकरणाचा अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना पाठवला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे