शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीने बाळंतिणीचा मृत्यू; नातेवाइकांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:12 IST

दाखल करण्यापूर्वीच प्रकृती नाजूक असल्याचा रुग्णालयाचा दावा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर येथील २२ वर्षीय वनीता बाविस्कर या बाळंतिणीचा शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टरांना जाब विचारून गोंधळ घातला. रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून वनीता हिची प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नाजूक असल्याची पूर्वकल्पना तिच्या नातेवाइकांना दिल्याचे सांगितले.ठाण्यातील ज्ञानेश्वरनगरमधील रहिवासी असलेल्या वनीता हिला गुरुवारी कळव्यातील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तत्पूर्वी त्यांना एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शुक्रवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. जन्माला आलेले बाळ हे केवळ आठ महिन्यांचे असल्याने व पूर्ण वाढ न झाल्याने त्याला कळवा येथील एका खाजगी रु ग्णालयात काचपेटीत ठेवण्यात आले. वनीता यांची प्रकृती प्रसूतीच्यावेळी चांगली होती. तिचे पती व वडील घरी गेल्यावर शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक तिची प्रकृती खालावली व वनीताचे निधन झाले. फोनवरून तिच्या नातेवाइकांना रु ग्णालय प्रशासनाने ही वार्ता दिली. तातडीने नातेवाइकांनी कळवा रु ग्णालयात धाव घेतली व डॉक्टरांना जाब विचारत गोंधळ घातला. वनीतावर उपचार करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.वनीता बाविस्कर हिची प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गंभीर होती, याची कल्पना तिच्या नातेवाइकांना दिली होती. तसेच तिला लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून रुग्णालयात दाखल केले होते. त्यातच, जोखमीची प्रसूती असल्याने वरिष्ठ डॉक्टरांनी तिची तपासणी केली होती. यामध्ये डॉक्टरांकडून कोणतीही हलगर्जी झालेली नाही.- डॉ. संध्या खडसे, डीन, कळवा, रुग्णालय, ठामपा