शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहायक नगररचनाकार तोडणकरांची बदली

By admin | Updated: May 1, 2017 06:03 IST

मागील दहा वर्षापासून बदलापूर पालिकेत सहायक नगररचनाकारपदी कार्यरत असूनही पुन्हा त्याच पालिकेत प्रतिनियुक्तीवर

बदलापूर: मागील दहा वर्षापासून बदलापूर पालिकेत सहायक नगररचनाकारपदी कार्यरत असूनही पुन्हा त्याच पालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांची सरकारने अखेर बदली केली आहे. त्यांची अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील नगररचना योजनेच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे.महाराष्ट्रात कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या हा नवीन विषय नाही. मात्र एकच अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहतो. त्या अधिकाऱ्याची बदली अन्य ठिकाणी होऊनही ते बदलीच्या ठिकाणी न जाता सलग काही वर्षे अनुपस्थित राहून पुन्हा तो त्याच ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळवतो. असाच काहीसा प्रकार बदलापूर पालिकेत घडला होता. बदलापूर नगर पालिकेत दहा वर्षापासून सहायक रचनाकारपदी असलेले तोडणकर यांना गेल्यावर्षी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही घटनांमुळे तोडणकर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. बदलापूर पालिकेत कार्यरत असताना पनवेल येथे बदली होऊनही तोडणकर यांनी तब्येतीचे कारण देत नियुक्ती स्वीकारली नाही. त्याचप्रमाणे सलग दोन वर्षे विनापरवानगी रजेवर असल्याकारणाने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश नगररचनाच्या सहसंचालकांनी दिले होते. पूर्वसूचना न देता हजर न राहिल्याने कारवाईचे आदेशही दिले होते. (प्रतिनिधी)राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाईसरकारने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील कार्यालयात रु जू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी राजकीय दबावाने बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर पालिकेत सर्वाधिक काळ सहायक नगररचनाकार म्हणून काम केल्याने ते नेहमीच चर्चेत राहिले होते.