शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्कायवॉकच्या डागडुजीला मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:53 IST

कल्याण : येथील स्कायवॉकच्या तळाला असलेले फायबरचे पत्रे कोसळण्याच्या घटना अधूनमधून सुरू असताना स्कायवॉकच्या डागडुजीला केडीएमसीला अखेर मुहूर्त मिळाला ...

कल्याण : येथील स्कायवॉकच्या तळाला असलेले फायबरचे पत्रे कोसळण्याच्या घटना अधूनमधून सुरू असताना स्कायवॉकच्या डागडुजीला केडीएमसीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तुटलेले रेलिंग, गायब झालेले संरक्षक बार आणि तुटलेल्या लाद्या यामुळे स्कायवॉक धोकादायक झाला असताना दुसरीकडे लाद्यांअभावी पडलेले खड्डे सिमेंटने भरण्यास सुरुवात केली आहे. लवकरच अन्य बाबींकडेही लक्ष घालण्याची मागणी पादचाऱ्यांकडून केली जात आहे.

रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यातून सुटका करण्याच्या अनुषंगाने २०१०-२०११ मध्ये पश्चिमेकडील भागात स्कायवॉकची उभारणी केली गेली. नोव्हेंबर २०१४ मध्ये स्कायवॉक एमएमआरडीएकडून केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आला. तेव्हापासून स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती करणे, फेरीवाले, गदुर्ल्ले, भिकारी यांच्या उपद्रवास आळा घालून स्कायवॉक पूर्णपणे पादचाऱ्यांकरिता खुला ठेवणे याची जबाबदारी केडीएमसीची आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने फेरीवाले आणि भिकाऱ्यांचे अतिक्रमण जैसे थे आहे. त्यात प्रवाशांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप दिलाची घटना गुरुवारी रात्री घडली. केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याने रेलिंग तुटलेल्या स्कायवॉकवरून पडून बबलू तलर हा दृष्टीहीन पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मे २०१८ मध्ये घडली होती. या घटनेनंतरही केडीएमसीला जाग आलेली नव्हती. त्यामुळे अपघाताचा धोका कायम होता. अखेर उशिरा का होईना, जाग आलेल्या केडीएमसीने तुटलेल्या लाद्यांच्या ठिकाणी सिमेंट भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

------------------------------------------------------