शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम अजूनही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाच्या छताचे पीओपी कोसळल्याची घटना १२ जुलै २०१७ ला घडली होती. ...

कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाच्या छताचे पीओपी कोसळल्याची घटना १२ जुलै २०१७ ला घडली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, याप्रकरणी झालेल्या चौकशीत हलगर्जीचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना केवळ समज देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे छत कोसळल्याच्या घटनेला सोमवारी चार वर्षे झाली तरी या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.

मुख्यालयातील महापालिका भवन इमारतीत चौथ्या मजल्यावरील या सभागृहात महासभेसह मोठ्या बैठका होतात. पीओपी कोसळल्याच्या घटनेआधी या सभागृहात ७ जुलै २०१७ ला तहकूब महासभा झाली होती. तर, १२ जुलैला विधिमंडळ सदस्यांची या सभागृहात बैठक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर ११ जुलैला सायंकाळी या सभागृहाची पाहणी करून ते बैठकीसाठी सज्जही ठेवले होते. परंतु, १२ जुलैच्या सकाळी ९ वाजता सभागृहाच्या छताचे पीओपी सांगाड्यासह खालील आसनव्यवस्थेवर कोसळले. सभागृह बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे महापालिकेचा बांधकाम विभाग आणि देखभाल दुरुस्ती करणारा कंत्राटदार वादात सापडले होते.

छत कोसळल्याच्या घटनेची चौकशी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे सोपविली होती. मागील १५ वर्षांच्या कालावधीत असलेले बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून मागविली होती. १५ वर्षांतील तपशील तपासला गेल्याने हलगर्जी नेमकी कोणाची? छत कोसळल्याचा ठपका नेमका ठेवायचा तरी कोणावर? या संभ्रमात प्रशासन होते. अखेर यातून केवळ ‘समज’ देण्यापुरतीच कारवाई झाली. यावर नगरसेवकांनीही त्यावेळी मौन बाळगल्याने एकूणच पीओपी कोसळल्याच्या घटनेचे त्यांनाही कितपत गांभीर्य होते, हे देखील त्यातून पुढे आले.

दुसरीकडे सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला. दोन वर्षांनंतर सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. दरम्यान, या छत कोसळण्याच्या घटनेला सोमवारी चार वर्षे झाली असताना नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यातून महापालिकेचा उदासीन कारभार चव्हाट्यावर आला आहे.

-------------

नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नव्हते. त्यामुळे काम काही महिने होऊ शकले नाही. त्यात फिनिशिंग मटेरियल बाहेरून मागविण्यात येणार आहे. कुशल कामामुळे विलंब लागत आहे. परंतु, सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

- सपना देवनपल्ली-कोळी, शहरअभियंता, केडीएमसी

----