शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे दूर

By admin | Updated: April 20, 2017 04:03 IST

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांबउभारणीच्या आड येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून येथील रहिवाशांनी स्वत:हून घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. १४० रहिवाशांना बीएसयूपीमध्ये, तर ६० रहिवाशांना रेंटलच्या घरांत शिफ्ट केले आहे. या पुलाच्या उभारणीसाठी कळवानाका, विटावा आणि साकेत भागांत खांबउभारणीचे काम सुरू आहे. कळवा खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर भागातून हा पूल जाणार आहे. मात्र, त्या ठिकाणी असलेली बेकायदा बांधकामे त्या कामात अडसर ठरू लागली होती. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तो महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने काही राजकीय पक्षांनी या भागातील मतांवर डोळा ठेवून कारवाईस विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई रखडली होती. दरम्यान, या कामासाठी या भागातील २४० बांधकामे हटवण्याची कारवाई हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने पुन्हा घेतला. परंतु, पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने येथील कारवाईला ब्रेक लागला होता. आता तो जवळपास सुटला असल्याने बुधवारी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी स्वत:हून आपली घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १४० लोकांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये केले असून ६० लोकांना रेंटलच्या घरांमध्ये जागा दिली आहे. प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे येथील नागरिकांचा यापूर्वी कारवाईला असलेला विरोधदेखील आता मावळल्याने कारवाईविरोधात रान उठवणाऱ्या नेत्यांनीदेखील मवाळ भूमिका घेतली आहे. नागरिकांनीच सहकार्याची भूमिका घेतली असल्याने या उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळणार आहे. महासभा झाल्यानंतर उद्यापासून या सर्व बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)