शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक लढाईपासून दूरच

By admin | Updated: June 3, 2017 06:10 IST

ठाणे, पालघरमध्ये झपाट्याने सुरू असलेले नागरिकीकरण, उरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, त्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे, पालघरमध्ये झपाट्याने सुरू असलेले नागरिकीकरण, उरलेल्या शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के शेतकरी अल्पभूधारक असणे, त्याच्या शेतीमालावर येथील रहिवासी अवलंबून न असणे आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव या कारणांमुळे राज्याच्या अनेक भागांत सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाचा लवलेश या दोन जिल्ह्यांमध्ये जाणवत नाही. शहापूर व मुरबाडच्या टोकावडे परिसरात शेतीमाल घेऊन येणारे ट्रक अडवण्याचा प्रयत्न शुक्रवारी स्थानिक शेतकऱ्यांनी केला. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका असून त्यासाठी येणारा भाजीपाला, दूधपुरवठा नाशिक, नगर, पुणे आदी जिल्ह्यांतून होत आहे. या पुरवठ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकरी सक्षम नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत. जिल्ह्यातील ८२ टक्के म्हणजे एक लाख आठ हजार ८१२ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. पावसाळ्यात ते केवळ भाताचे उत्पन्न घेतात. स्थानिक बाजारपेठेतही त्यांचा भाजीपाला जात नाही.स्थानिक शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे उत्पादन काही महिने आधीच संपले आहे. नागरिकीकरणाच्या रेट्यात शेतीखालची जमीन झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात केवळ ७७ हजार ६४४ हेक्टर शेती असून त्यावर एक लाख ३२ हजार शेतकऱ्यांची मालकी आहे. यापैकी एक लाख आठ हजार ८१२ शेतकरी अल्पभूधारक आहेत. केवळ १८ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. शेतीला लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी उत्पादन होत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून तो शेतीतून बाहेर पडत आहे. यापेक्षा मजुरी करणे त्याने स्वीकारले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खंबीर नेतृत्व नाही. शेतकऱ्यांच्या संपाला ठाणे, पालघरमधून प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. खंबीर नेतृत्वाचा अभाव असून दुर्दैवाने शेतकरी संघटित नाही. मात्र, त्यांना कर्जमाफी हवीच आहे. बहुतांश शेतकरी थकबाकीदार आहेत. संपाला पाठिंबा देण्यासाठी लवकरच ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, टीडीसीसी बँकएकूण १० एकरमध्ये १७ हजार केळींची बाग आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही केळी काढणे थांबवले आहे. सुमारे १०० शेतकऱ्यांचा एक गट ठाणे, पालघरमध्ये केळी उत्पादक आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. - निलेश भोईर, गांद्रे, वाडागुजरातमधून दूध आणणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, तसे झाल्यास ठाणे, पालघरमधील आइस्क्रीम पार्लर कुणबीसेना चालू देणार नाही. ७ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते माधव भांडारी यांना नांगर, बी-बियाणे भेट देऊन निषेध करणार आहे. यापुढे आम्ही फक्त घराला पुरेल तेवढेच अन्नधान्य पिकवणार आहे. - प्रफुल्ल पाटील, कुणबीसेना, जिल्हाप्रमुखशहापूर तालुक्यात सध्या भाजीपाला व दुधाचे फारसे उत्पादन नाही. शहरात भाजीपाला जात नाही. काही शेतकरी दूध उत्पादक असले, तरी दोन ते पाच रुपयांचा नफा मिळवून विकतात. तालुक्यात कोठेही दूध उत्पादक सोसायट्या नाहीत. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. शेतकरी गरीब आहे. या संपाला शेतकऱ्यांचा फारसा पाठिंबा दिसून येत नाही.- राकेश वारघडे, शाई शेतकरी संघर्ष समिती