शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हजरत हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 02:45 IST

मोहरमच्या इतिहासाची कथा : मूठभर नागरिकांचा हुकूमशहाविरोधातील संग्राम

- हुसेन मेमनजव्हार : इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे एक ऐतिहासिक युध्द झाले. हिजरी संवतचा (इस्लामिक वर्ष) पहिला महिना म्हणजे मोहरम होय. या महिन्याच्या १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात इ.स.६८० मध्ये) मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खिलफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी शाहिद केले तो दिवस म्हणजे यौमे आशुरा होय. याच दिवशी हजरत हुसैन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीमध्ये मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.करबलामध्ये एका बाजूला हजरत हुसेन यांच्यासोबत केवळ ७२ तर दूसऱ्या बाजुला यजिद यांचे तब्बल ४० हजार सैनिक होते. ७२ जणांमध्ये महिला-पुरूष व ५१ मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुसºया बाजूला यजिद यांच्या सैन्याचे नेतृत्व उमर इब्ने सईद यांच्या हातात होती. युध्दाचे कारण -इस्लाम धमार्चे पाचवे खिलफा अमीर मुआविया यांनी खिलफाच्या निवडणुकीत समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. तो त्या काळी गुंड म्हणून कुप्रसिध्द होता. समाजात त्याची प्रतिमा डागाळलेली होती. त्यामुळे त्याकाळच्या मुस्लिम समाजबांधवांना यजीद खिलफा झाल्याचे रूचले नाही. यजिदने समाजाविरूध्द बंड केले. पण यजिद समोर मोहम्मद पैगंबर यांच्या परिवारातील हजरत हुसेन यांचे आवाहन होते कारण ते यजिदसमोर झुकण्यास तय्यार नव्हते. यजिदने हजरत हुसैन यांनी त्याला खिलफा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले.हजरत हुसेन यांनी आपले मोठे बंधु इमाम हसन यांच्यासोबत आपल्या परिवारील लहान मुले व महिलांसह यजिदशी युद्ध केले. यात हजरत हुसेन यांच्या परिवारातील सर्वजण शहिद झाले. पण पराक्र मी योद्धा असलेल्या हुसेन यांचा ते पराभव करु शकले नाही. युद्धभूमीवर सायंकाळची (असरची) नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन नमाज साठी ्झुकले असताना यजीदच्या (पान २ वर)