शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir Injection : रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची दगदग सुरूच, रुग्णालयांचे हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 00:17 IST

Remdesivir Injection : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा रुग्णांच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णाची प्रकृती खालावल्याने थेट प्रत्येक डॉक्टर या इंजेक्शनची मागणी करीत आहेत.

अंबरनाथ : रेमडेसिविर हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील एकही रुग्णालय प्रशासन ते उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदारी घेत नाहीत. सरसकट रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन उपलब्ध करण्यास भाग पाडले जात आहे, तर पालिका प्रशासनही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करताना दिसत नाही.रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा रुग्णांच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णाची प्रकृती खालावल्याने थेट प्रत्येक डॉक्टर या इंजेक्शनची मागणी करीत आहेत. मात्र अंबरनाथ आणि बदलापुरात आज हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही एजन्सी नाही. अशा कठीण परिस्थितीत अंबरनाथ आणि बदलापुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना उल्हासनगर आणि कल्याण या भागात इंजेक्शनसाठी जावे लागते. मात्र त्याठिकाणीही ८०० ते ९०० लोकांची वेटिंग लिस्ट लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, असे सरकारचे आदेश लागू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शहर पातळीवर सुरू झालेली नाही. शहरातील रुग्णालय अद्यापही रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध करून घेण्याची जबाबदारीही त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. आजही अनेक रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र इंजेक्शनचा तुटवडा असल्याने ते वेळेवर उपलब्ध होत नसून रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रुग्णाला इंजेक्शनची गरज आहे एवढेच सांगून डॉक्टर जबाबदारी झटकत असून, कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस