शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक जागेवर सनद, भूखंडांवर माफियांची नजर, उल्हासनगर बंदचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:36 IST

उल्हासनगर बंदचे आवाहन : जाब विचारण्यासाठी प्रांत कार्यालयावर धडक देण्याचा निर्धार

उल्हासनगर : सिंधी समाजाच्या धार्मिक जागेवर सनद दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरबंदचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. सनदप्रकरणी प्रांत कार्यालय गाठून जाब विचारण्याचा निर्धार केला जात असल्याने, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं.-५ येथे शहराची स्थापना झाली, तेव्हापासून सिंधी समाजाचा एक प्रसिद्ध दरबार आहे. तेथे सिंधी समाजाचे विविध कार्यक्रम दरवर्षी होतात. या जागेवरही सनद दिल्याने वाद उद्भवला आहे. सन १९३८ दरम्यान ब्रिटिश सरकारने महायुद्धाच्या वेळी येथे लष्करी छावणी सुरू केली. भारताच्या फाळणीवेळी सिंध प्रांतातील सिंधी समाजाला विविध ठिकाणी वसवण्यात आले. त्यापैकी एक लाखापेक्षा जास्त सिंधी समाजाला ब्रिटिशकालीन छावणीतील जागेत वसवण्यात आले. ज्यांच्याकडे १९६० पूर्वीचा जागेवर ताबा आहे, अशांना पुरावा सादर केल्यावर सनद म्हणजे जागेचा मालकी हक्क देण्याचे काम प्रांत कार्यालयामार्फत राज्य शासनाने केले. ब्रिटिशकालीन छावणी वसवण्यापूर्वी तत्कालीन शासनाने स्थानिक गाववाल्यांच्या जमिनी घेतल्या, असा कांगावा करून सनदच्या नावाखाली जागेची मालकी प्रांत कार्यालयाकडून घेतली जात आहे.

कॅम्प नं.-४, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या धोकादायक बंद पोलीस निवासस्थानावर अशीच सनद दिल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यादीत सदर निवासस्थाने पोलिसांची मालमत्ता दाखवली आहे.बंदमध्ये राजकीय नेते सहभागी होणार का?च्पोलीस वसाहतीसह सिंधी समाजाच्या एका धार्मिक दरबारावरही सनद काढण्यात आली. दरबारातील संतांनीही नाराजी व्यक्त करून या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर धडक देणार असल्याचे सांगितले. समाजातील नेत्यांनी याविरोधात बंदचे आवाहन केले.च्स्थानिक नेते शहर बंदमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शहरातील व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे