शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी हगणदारीमुक्त करा, अन्यथा अनुदान रद्द करू

By admin | Updated: March 31, 2017 05:47 IST

महापालिका क्षेत्रात विविध उपाययोजना करूनही भिवंडी हगणदारी मुक्त न झाल्याने सरकारकडून स्वच्छतेच्या कामासाठी

भिवंडी : महापालिका क्षेत्रात विविध उपाययोजना करूनही भिवंडी हगणदारी मुक्त न झाल्याने सरकारकडून स्वच्छतेच्या कामासाठी मिळणारे अनुदान रद्द होण्याची शक्यता आहे. स्वच्छता विभागातील नाकर्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रद्द होणार आहे. हे अनुदान कायमस्वरूपी सुरू रहावे यासाठी उपायुक्तांनी सर्व प्रभाग आरोग्य निरीक्षकांना आदेश देत शहरातील सर्व स्वच्छतागृहाचा अहवाल मागितला आहे.महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कामगार वर्ग राहत असल्याने त्यांच्यासाठी व गरीब नागरिकांसाठी एमएमआरडीएच्या अनुदानातून स्वच्छतागृहे बांधलेली आहेत. तरी देखील परिसरातील नागरिक उघड्यावर प्रातर्विस जात असल्याचे आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षकांना याचा जाब विचारला आहे. शहरात सुरू असलेल्या वस्ती स्वच्छतागृहाविरोधात पालिका प्रशासन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत लेखी व तोंडी तक्रारी गेल्या आहेत. या स्वच्छतागृहासाठी परिचालन करणाऱ्या संस्था अटी शर्तीचे पालन करीत नाहीत. त्या परिसरातील नागरिकांना मासिक पास न दिल्याने उघड्यावर प्रातर्विधीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनेची सरकारने दखल घेत शहर हगणदारी मुक्त न झाल्यास मिळणारे अनुदान रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वस्ती स्वच्छतागृहाची पाहणी करून अटींचा भंग केलेल्या संस्थेवर कोणती कारवाई केली, याचा तपशील सरकारला सादर करण्यासाठी उपायुक्तांनी आरोग्य निरीक्षकांकडून अहवाल मागितला आहे. (प्रतिनिधी)... तर करार रद्द कराया अहवालात स्वच्छतागृहाच्या बांधकामात बदल केल्याची माहिती,खंड न पडता त्याचा वापर सुरू आहे का? करारपत्रानुसार मासिक पास दिले जातात का?,पाणी, विजेचा गैरवापर होत आहे का?,स्वच्छतागृहाच्या कंत्राटदाराचे नाव कळविले आहे का?,धर्मदाय निबंधकांकडून दरवर्षी संस्थेचे लेखापरीक्षण करून त्याचे विवरण पत्र दिले आहे का?आदींचा समावेश अहवालात करायचा आहे. अटींचा भंग करणाऱ्या संस्थेचे करार रद्द करण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.