शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ‘त्या’ खासगी रुग्णालयांना ऑगस्टपर्यंत दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंब्य्रातील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर शहरातील खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंब्य्रातील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर शहरातील खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली होती. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ३४७ रुग्णालयांना पुन्हा नोटीस बजावत अग्निसुरक्षा सक्षम करण्यास सांगितले आहे. परंतु, आता राज्य सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा नसली तरी रुग्णालय ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे स्पष्ट केले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणे महापालिकेनेही ‘बी’ फॉर्मच्या आधारावर या रुग्णालयांना तूर्तास ऑगस्ट २०२१ पर्यंत दिलासा दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. शहरातील खासगी रुग्णालयाच्या परवानगीबाबत काय निर्णय घेतला आहे, फायर एनओसीसाठी काही तारीख वाढवून दिली आहे का, असा प्रश्न विचारला.

ठाणे शहरात सरकारी, महापालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास आहे, तर एकूण ४३७ रुग्णालये शहरात आहेत. मुंब्रा शहरातील रुग्णालय दुर्घटनेनंतर ठामपाने शहरातील सर्व रुग्णालयांना पुन्हा नोटिसा बजावत अग्निसुरक्षा सक्षम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचे उघडकीस आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असल्याचे, तर ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. या ६५ रुग्णालयांना नोटिसा बजावून अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने दिले होते. मात्र, त्याकडे या रुग्णालयांनी अद्यापही दुर्लक्ष केले होते.

परंतु, आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अशा रुग्णालयांना आता राज्य सरकारनेच ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याचाच आधार घेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानेही शहरातील अशा रुग्णालयांना फायर एनओसी नसली तरी देखील ‘बी’ फॉर्मच्या आधारावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

----------------