शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वातानुकूलित बसचे १५ आॅगस्टला लोकार्पण

By admin | Updated: August 11, 2016 04:01 IST

पालिकेच्या परिवहन ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे.

भाईंदर : पालिकेच्या परिवहन ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित बसचा लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे. उद््घाटनाच्यादिवशी बसमधून प्रवास करणाऱ्यांना एक दिवसाची विनामूल्य सफर घडविण्याचा निर्णय महापौर गीता जैन यांनी घेतला आहे.पालिकेने २०१० मध्ये खाजगी लोकसहभाग तत्वावर सुरु केलेल्या परिवहन सेवेत वातानुकूलित बसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी केंद्राच्या तत्कालिन जेएनएनआरयूएम योजनेतंर्गत एकूण २५० पैकी ५० बस खरेदी केल्या. या सेवेच्या कंत्राटातंर्गत पालिकेने कंत्राटदारा कंपनीला बस आगारासाठी जागाच उपलब्ध करुन न दिल्याने वातानुकूलित बस खरेदीचा प्रस्ताव मागे पडला. दरम्यान तीन ते चार वर्षातच या सेवेतील बस नादुरुस्त झाल्याने ही सेवा असमाधानकारक ठरु लागली. प्रशासनाने ही सेवा मोडीत काढत २५ सप्टेंबर २०१५ मध्ये कंत्राटावरील बससेवा सुरु केली. ही सेवा ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवर चालविण्याचा निर्णय झाल्याने दुसऱ्या टप्प्यात १०० बस खरेदी केल्या. सध्या सेवेत ४३ मिडी व स्टॅन्डर्ड बस समाविष्ट केल्या असून त्यातील सुमारे ३६ ते ३८ बसच दररोज प्रवाशांना सेवा देत आहेत. उर्वरित ५७ बसमध्ये १० मिनी, १० वातानुकूलित व ३७ स्टॅन्डर्ड प्रकारच्या बसचा समावेश आहे. दरम्यान १० पैकी ५ वातानुकूलित बस नुकत्याच सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसची नोंदणी प्रक्रीया अलिकडेच पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळा १५ आॅगस्टला होणार आहे. (प्रतिनिधी)