शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निपुंगेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पोलिसांचा अटक करण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:14 IST

महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज, सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला.

ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीन अर्ज, सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला. त्यामुळे निपुंगेंना अटक करण्याचा पोलिसांचा मार्गही मोकळा झाला आहे.या प्रकरणात एसीपींविरुद्ध परिस्थितीजन्य, तसेच प्रथमदर्शनी पुरावे आहेत. तिला त्यांनी १११ कॉल्स केल्याचेही सीडीआर रेकॉर्ड मिळाले आहे. जुलै २०१७ पासून ते तिचा मानसिक छळ करत होते. याबाबत, तिने आपल्या भावी नवºयालाही माहिती दिली होती. याच आधारावर तिच्या भावाने कळवा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत निपुेंगेचे नाव घेतले आहे. कॉन्स्टेबलनंतर अनेक अधिकारी असतानाही, त्यांनी तिला वारंवार संपर्क करण्याचे कारण स्पष्ट होत नाही. अशा अनेक बाबी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी निदर्शनास आणल्या. चौकशीसाठी त्यांची पोलीस कोठडी गरजेची असून, त्यांचा मोबाइलही जप्त करण्याची परवानगी मागितली. त्यावर, निपुंगे यांचा या आत्महत्येशी संबंध नाही, पण ते पोलिसांना संपूर्णपणे सहाय्य करतील. त्यामुळे त्यांना रोज पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. मोबाइलही ते द्यायला तयार आहेत, परंतु त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, अशी बाजू आरोपीच्या वतीने अ‍ॅड. धोत्रे यांनी मांडली. उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर, सोमवारी न्यायालयाने निपुंगेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.काय होऊ शकते...ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने निपुंगेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला होता. आता अटकपूर्व जामीन अर्जही उभय पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर फेटाळला. यामुळे त्यांना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागावी लागेल. त्या काळात पोलीस त्यांना अटक करू शकतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय