शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत पुन्हा गोंधळात मंजुर झाले ९०० कोटींहून अधिकचे प्रस्ताव, भाजपा व राष्ट्रवादीने घातला महापौरांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:06 IST

नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

ठळक मुद्देटिएमटीच्या १५० बसेस खाजगी ठेकेदाराला देण्याच्या मुद्यावरुन झाला गोंधळसत्ताधाऱ्यांनी पुन्हा टाकली प्रशासनापुढे नांगी

ठाणे - सोनेरी ठेकेदार कोण कोण... सत्ताधारी हाय हाय अशा घोषणा देऊन विरोधकांनी टीएमटीतर्फे १५० बसची दुरुस्ती करून त्या खाजगी ठेकेदाराला चालविण्यास देण्यासंदर्भातील प्रस्तावाला शनिवारच्या महासभेत जोरदार विरोध केला. या गोंधळातच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटातच तब्बल ९०० कोटींहून अधिकचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांनी घेराव घालून डायसवर ठिय्यादेखील मांडला. परंतु, तोपर्यंत महासभाच संपली होती.या महासभेत रस्ते, गटार, पायवाटा, मलनिसारण,आरोग्य असे एकाहून एक कोट्यावधीचे विषय मंजुरीसाठी पटलावर होते. यात काही किचकट प्रस्तावसुद्धा होते. या विषयांवरून वादंग होणार हे निश्चित मानले जात होते. तसेच शहरातील बेकायदा होर्डिंग्जचा विषयही महासभेत गाजणार होता. त्यामुळे या प्रकरणावरून प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यानुसार महासभेची सुरुवात होताच टीएमटीच्या ताफ्यातील १५० बसची ८.५० कोटी खर्चुन दुरुस्ती करून त्या खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी पटलावर आला असता, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या प्रस्तावात भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप करून ठराविक सोनेरी ठेकेदाराला बस देण्यासाठीच तो आणल्याचा गौप्यस्फोटही केला. यावेळी प्रशासनावर आरोप करतांनाच सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरद्धा त्यांनी शंका उपस्थित केल्या. या बसवर चालक खाजगी ठेकेदाराचे राहणार असून परिवहनच्या कर्मचाºयांचे काय करणार असा सवालही त्यांनी केला. तसेच १५० बसपैकी ८० बसचे आयुर्मान संपले असून त्या दुरुस्त करून केवळ ठेकेदारासाठी पायघड्या कशासाठी असा सवालही त्यांनी केला. एकामागून एक आरोप ते प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर करीत असतांनाच सभागृह नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. येथूनच पुढे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरू झाले. गोंधळ थांबत नसल्याने अखेर पीठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी विषय पत्रिका वाचण्यास सांगितले आणि गोंधळातच अनेक महत्त्वाचे विषय कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर केले. याबाबत भाजपाने आक्षेप घेत थेट डायसवर जाऊन महापौरांना घेराव घातला. राष्ट्रवादीच्या मंडळींनीसुध्दा घेराव घातला, परंतु तो पर्यंत अजेंड्यावरील सर्व विषय मंजुर करुन घेत, सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीत घेत महासभा संपविली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त