शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करण्यावर पालिका देणार भर, विहिरींची पुन्हा केली जाणार सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:08 IST

शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने यंदासुध्दा शहरातील ३३९ विहिरींचा सफाई केली जाणार असून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे.

ठळक मुद्देवापरात नसलेल्या २१६ विहिरी शहरातविहिरीतील १.८ दशलक्ष लीटर पाणी पिण्यास अयोग्य

ठाणे - मे महिना सुरु होण्यापूर्वीच ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ठाण्यातही आता ३० तासांचे शटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने उपलब्ध नैसर्गिक स्त्रौतांकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील विहिरींना पुनर्जिवन देण्याच्या हालचाली पालिकेने पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत.                     ठाणे शहराला आजच्या घडीला रोज सुमारे ४८० दशक्षल लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला हे पाणी मुबलक आहे. परंतु असे असतांनाही शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने आणि आता महापालिकेने पाणी कपात सुरु केल्याने शहरातील बहुसंख्य भागांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या शहरात दर बुधवारी तब्बल ३० तासांचे शटडाऊन घेतले जात आहे. परंतु उपलब्ध असलेल्या याच पाण्याचा वापर अनेक ठिकाणी गाड्या धुवणे, बगीचांना पाणी घालणे आणि इतर कामांसाठी केला जात आहे. दरम्यान मागील काही वर्षात शहरात पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करु लागल्याने २०१० मध्ये पालिकेने शहरात असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्यानुसार शहरात असलेल्या परंतु दुषित झालेल्या विहीरींची शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार आजच्या घडीला शहराच्या विविध भागात ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली होती. परंतु यातील काही विहीरी पडीक, वापरात नसने, कचऱ्याने निर्माण झालेली दुर्गंधी, काही विहिरी कोरड्या पडल्या होत्या, काहींमध्ये गटरांचे पाणी गेल्याने ४० टक्के भुर्गभातील पाणी साठी हा अशा विविध कारणांमुळे दुषित झाल्याची माहितीही पालिकेच्या सर्व्हेत पुढे आली होती.दरम्यान आजच्या घडीला वापरात नसलेल्या विहीरींची संख्या ही २१६ वर गेली आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ वर आली आहे. या विहिरीतील पाण्याचे साठयचे मोजमाप हे ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष लीटर पाणी हे वापरास अयोग्य असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून आढळून आले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचाही निर्ष्कश काढण्यात आलेला होता. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत, त्या विहिरीतील पाणी साठी आता पालिकेला उपयोगात आणण्याचे प्रयोजन केले आहे. त्यानुसार पालिकेने यंदा पाणी टंचाई भासू नये म्हणून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरात आणण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, या विहिरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या पाण्याचे शुद्धीकरण करणे विहिरींची दुरुस्थी करणे आदी कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त