शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचा लवकरच होणार पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:44 IST

नव्या वास्तूत बहुमजली वाहनतळ : प्रभाग कार्यालयेही हलविणार इतरत्र

डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार आहे. महापालिका बीओटी तत्वावर हे काम करणार आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत येथील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयांचेही विकेंद्रीकरण केले जाणार आहे. दरम्यान, नवीन वास्तूत बहुमजली वाहनतळासह खाजगी आणि केडीएमसीच्या कार्यालये असणार आहेत.

केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय ४० वर्षे जुने असून, ते रेल्वे स्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. सध्या स्थानक परिसरातील वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अडचणींचा विचार करता या जागेचा वापर नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी करण्यासाठी या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या इमारतीत तत्कालीन डोंबिवली नगरपालिकेचे कार्यालय होते. केडीएमसीची स्थापना झाल्याने त्याचा डोंबिवली विभागीय कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. तसेच डोंबिवली पूर्वेतील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये सध्या याच इमारतीत आहेत.

जागेचे महत्त्व महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभाग क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी. पी. चेंबर तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. पी. पी. चेंबरमधील पहिला आणि दुसरा मजला ‘फ’ प्रभागासाठी घेतला जाणार आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करताना मुख्य वास्तूत सुसज्य वाहनतळ उभारण्यात येणार आहे. तळघर, दुसरा व तिसरा मजला वाहनतळासाठी असणार आहे. तळ व पहिला मजला खाजगी कार्यालये आणि व्यापारी संकुलासाठी असणार आहे, तर वरील मजले केडीएमसी कार्यालयासाठी असतील. बोडके यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत यासंदर्भातील कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.पुनर्विकास ‘बीओटी’तूनविभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला असलातरी तो बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर केला जाणार आहे. सद्यस्थितीतील महापालिकेकडील आर्थिक स्त्रोताचा विचार करता हा प्रस्तावित प्रकल्प महापालिकेला स्वत:च्या निधीतून उभारणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या जागेचा मुलभूत आणि आर्थिकदृष्टया योग्य प्रकारे वापर करण्यासाठी खाजगीकरणातून हा प्रकल्प उभारणे सोईस्कर असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. दरम्यान, ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग अन्यत्र जागेत हलविण्यासंदर्भात येणाºया खर्चाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.६५६९.२० चौरस मीटर भूखंडसध्या महापालिका विभागीय कार्यालयाच्या भूखंडावर के. बी. विरा शाळा आणि त्याशेजारीच महापालिकेच्या शाळेची इमारतही आहे. या व्यतिरिक्त उर्वरित जागेवर डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत आहे. या एकत्रित भूखंडाचे क्षेत्रफळ अंदाजे ६५६९.२० चौरस मीटर इतके आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका