शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक प्रस्तावाला रेड सिग्नल

By admin | Updated: December 22, 2016 05:43 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक तसेच पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सल्लागार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक तसेच पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सल्लागार कंपनीने तयार केलेल्या अहवालाच्या प्रस्तावाला मंगळवारच्या महासभेत स्थगिती देण्यात आली. या प्रस्तावात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असून परिपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश महासभेने प्रशासनाला दिले. वाहतूक तसेच पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मे. आकार अभिनव कंपनी प्रा.लि. यांची सर्वेक्षणासह विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्ती केली आहे. या संस्थेने महापालिका हद्दीतील प्रमुख रेल्वेस्थानके व त्यालगतच्या परिसराचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन उपाययोजनांसाठी ११ हजार १२६ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील २० वर्षांच्या कालावधीसाठी या खर्चाचे नियोजन करण्यासाठी संबंधित प्रकल्प अहवालास महासभेची मान्यता मिळण्यासाठी मंगळवारी प्रस्ताव दाखल केला होता. येत्या दोन ते तीन वर्षांत कल्याण-डोंबिवली शहरांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यात डोंबिवली शहरातील मानपाडा चाररस्ता, घरडा सर्कल, अक्षय हॉस्पिटल, मानपाडा जंक्शन तर कल्याणमधील दुर्गाडी चौक, सुभाष चौक, भवानी चौक, खडकपाडा चौक, शहाड चौक आदी नऊ ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिली. तसेच गजानन चौक, मोहिंदर सिंग शाळेच्या चौकात पादचारी पूल उभारायचा आहे. काही मार्ग एकदिशा करण्याचेही प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)संस्थेने चुकीची माहिती पुरवलीप्रस्ताव चर्चेला येताच यात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याकडे सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी लक्ष वेधले. संस्थेने पुरवलेली माहिती चुकीची आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. २० वर्षांत ११ हजार १२६ कोटी ७२ लाख रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे वर्षाला साडेपाचशे कोटी रुपये खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. हा खर्च महापालिकेला परवडणारा आहे का, असा सवाल नगरसेवक श्रेयस समेळ यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारकडून यासाठी निधी येणार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. रस्त्यात अडथळा ठरणारे ट्रान्सफॉर्मर, टपऱ्या हटवा वाहतूक सुरळीत होईल, अशी सूचना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली.