शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भरती, बढती नियम लालफितीत

By admin | Updated: September 23, 2016 03:17 IST

ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव करून कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती, बढतीसंदर्भातील नियमावली २०११ मध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली होती

ठाणे : ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव करून कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती, बढतीसंदर्भातील नियमावली २०११ मध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु, तिला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पालिकेत अद्यापही २०८५ पदे भरलेली नाहीत. यामुळे पालिकेतील अनेक सहायक आयुक्त, उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चार ते पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार पडला आहे. यामुळे नागरिकांच्या कामांनादेखील त्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याचेही दिसून येत आहे. याचसंदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिकाने न्यायालयात धाव घेतली असून त्याच्या सुनावणीत महापालिकेला चार आठवड्यांत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे महापालिकेने २०१० मध्ये ठराव क्रमांक १७३ अन्वये मंजूर केलेली कर्मचारी, अधिकारी यांची भरती, बढती नियमावली २०११ मध्ये शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. परंतु, तिला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आता माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, पालिकेने स्थापित केलेल्या विभागीय बढती समितीने काही पदे थेट भरतीने, तर काही बढतीने भरली. ही पदे थेट भरताना अथवा बढतीने भरताना काही प्रशासकीय कर्मचारी व तांत्रिक विभागातील अधिकारी, अभियंत्यांना प्रारूप भरती, बढतीचे निकष शिथिल करून बदली देण्यात आली. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी सहायक आयुक्त, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख बढतीपासून अनेक वर्षे वंचित राहिले आहेत. दरम्यान, काही अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदांचा पदभार सोपवण्यात आला आहे. शासनाच्या २७ डिसेंबर २०११ च्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी अतिरिक्त पदाचा पदभार सुरू ठेवायचा असेल, तर अशा प्रकरणी दोन वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी शासनाची पूर्वानुमती घेणे आवश्यक आहे. तसेच पूर्वानुमती न घेता अतिरिक्त कार्यभाराची व्यवस्था दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी चालू ठेवण्यास कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच वरील तरतुदींचे पालन न करता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ अतिरिक्त पदाचा कार्यभार चालू ठेवणाऱ्या व त्यासाठी विशेष वेतन मंजूर करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे या शासन निर्णयात नमूद केले आहे.