शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मालमत्ताधारकांकडून ४४६ कोटी ७४ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:17 IST

आगामी काळात महापालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने तीन महिने आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती.

ठाणे : आगामी काळात महापालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने तीन महिने आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार ७ मार्चपर्यंत ४ लाख ७५ हजार ९१५ मालमत्ताधारकांकडून पालिकेने तब्बल ४४६.७४ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी हीच वसुली ४४६.४१ कोटी एवढी होती. त्यात आता काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ६०० कोटींचे उद्दिष्ट आता ५६० कोटींवर आले आहे. येत्या २० दिवसांत मात्र या उद्दिष्टाची पूर्ती होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. यंदाही कळवा, मुंब्रा आणि दिव्यातून वसुलीचे प्रमाण कमी झाले.मालमत्ता कर विभागाला यंदा ६०० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु आता २० दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने त्या उद्दीष्टापर्यंत पोहचणे कदाचित मालमत्ता कर विभागाला शक्य होणार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट ४० कोटींनी कमी करण्यात येऊन, ५६० कोटी निश्चित करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी-कर्मचारी व्यस्त होणार असल्याची बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने डिसेंबरच्या आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मालमत्तांचा लिलाव, जप्तीची कारवाई आदींसह इतर मोहीमासुध्दा हाती घेण्यात आल्या होत्या.दरम्यान, ७ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर विभागाने ४ लाख ७५ हजार ९१५ मालमत्ताधारकांकडून ४४६.७४ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी याच तारखेला ही टक्केवारी ४४६.४१ कोटी एवढी होती. यंदा ३३ कोटींची वाढ झाली आहे.मुंब्रा, दिव्याची वसुली पुन्हा घसरली, ठाण्यातील लोकमान्य, सावरकरनगरमध्येही घटमुंब्रा आणि दिव्यात वसुलीचे प्रमाण हे दरवर्षी कमी असल्याचे दिसून आले आहे. यंदासुध्दा ते वाढले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंब्य्रातून ५६ हजार ६६५ मालमत्ताधारकांकडून केवळ १७.२९ कोटींची वसुली झाली आहे. दिव्यातून ८९ हजार ८३ मालमत्ताधारकांकडून ३०.२३ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी या दोन्ही प्रभाग समितीमधून ५०.८३ कोटींची वसुली झाली होती. त्या खालोखाल कळवा प्रभाग समितीमधून ५२ हजार २४७ मालमत्ताधारकांकडून २१.५३ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी हा आकडा २३.३५ कोटी होता.त्यानंतर लोकमान्य, सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये वसुली जास्त घटली असल्याचे स्पष्ट होत असून येथून आतापर्यंत २१.१७ कोटी वसुली झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ४०.३६ कोटींची वसुली झाली होती. उथळसर प्रभाग समितीमधून ३१.७५ कोटींची वसुली झाली असून मागील वर्षी ४३.०९ कोटींची वसुली झाली होती. वागळे इस्टेट प्रभाग समितीची वसुलीसुध्दा कमी झाली असून ती १८.०७ कोटी एवढी आहे. नौपाडा प्रभाग समितीमधून ६९.८३ कोटी, माजिवडा मानपाडा ११८.८९ कोटी, वर्तकनगर ६७.२२ कोटी आणि हेडआॅफीसमधील वसुली ५०.७६ कोटी अशी जास्तीची वसुली झाली आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका