शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आधाराची गरज ओळखा

By admin | Updated: October 5, 2016 02:28 IST

मनाने खचलेल्यांना कुटुंबाने, परिसरातील लोकांनी मानसीक आधार देण्याची गरज असते

ठाणे : मनाने खचलेल्यांना कुटुंबाने, परिसरातील लोकांनी मानसीक आधार देण्याची गरज असते. जेणे करुन तो पुढच्या क्रोनीक आजारात जाण्याची शक्यता कमी असते. मानसिक आधाराची गरज ओळखून मदत करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. रत्ना रावखंडे यांनी केले. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे मंगळवारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात डॉ. त्यांच्या हस्ते उद्घाटन केले. जेव्हा एखाद्याचे मानसिक आरोग्य बिघडायला सुरूवात होते तेव्हा त्याला कुटुंबाने कसा आधार द्यावा याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, शरिराबरोबर मन ही निरोगी हवे. शरिर निरोगी असेल पण मन निरोगी नसेल तर जीवन आनंददायी होत नाही. जसे शरिर स्वास्थ्य बिघडल्यावर घरातील वातावरण बिघडते. तसे मानसीक स्वास्थ्य बिघडल्यावर कुटुंबाचेही स्वास्थ्य बिघडते. प्रथमोपचार म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. मानसिक आरोग्य बिघडलेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते कारण त्यातून त्याला बाहेर पडायचे असते. पुढील आयुष्य जगण्यासाठी आपणच त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी मानसिक प्रथमोपचार - सर्वांकरिता या घोषवाक्यावर आधारीत प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचारिकांनी पथनाट्य सादर केले. यातून आपत्कालीन परिस्थितीत कशी मदत करावी. शरिर आणि मन वेगळे नाही त्यामुळे जशी शरिराला प्रथमोपचाराची गरज असते तशी मनालाही असते. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवेचे प्रथमोपचार, मानसीक आरोग्याची तत्काळ परिस्थिती कशी समजून घ्यावी अशा महत्त्वाच्या बाबींवर प्रकाशझोत टाकला. मनोरुग्णालयाच्या प्रभारी अधिक्षक डॉ. उज्ज्वला गुटे - केंद्रे यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, १० आॅक्टोबरपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. जशी शारिरीक इजा लक्षात घेतली जाते तसे मानसिक इजाही लक्षात घ्या असे सांगत पथनाट्य सादर केलेल्या परिचारिकांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपा किणकर यांनी केले. या सप्ताहाच्या निमित्ताने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने गणेशपुरी येथे आरोग्य तपासणी शिबीराचेदेखील आयोजन केले होते. जवळपास १०० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)