शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वाहकांच्या भरतीस मान्यता, परिवहन समितीचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:47 IST

कल्याण केडीएमटी उपक्रमाच्या दैनंदिन बस संचालनासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक पुरवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

कल्याण - केडीएमटी उपक्रमाच्या दैनंदिन बस संचालनासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक पुरवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला गेल्याने बसच्या संचालनात वाढ होईल, असा दावा व्यवस्थापनाने केला आहे. याआधी एएमसीच्या माध्यमातून कंत्राटी चालक नेमण्यात आले असताना पहिल्या टप्प्यात ५० कंत्राटी वाहक घेतले जाणार आहेत, तर पुढील टप्प्यात २५ वाहकांची नेमणूक केली जाणार आहे.कंत्राटाच्या माध्यमातून याआधी सुरू करण्यात आलेली वार्षिक देखभाल दुरुस्ती (एएमसी) केडीएमटी उपक्र मासाठी लाभदायक ठरत आहे. सध्या ७५ बस रस्त्यावर धावत आहेत, त्यात एएमसीमुळे बसच्या संख्येत आणखीन ३० ने वाढ होणार आहे. केडीएमटीच्या उपक्रमात २१८ बसचा ताफा आहे. पण, वाहक आणि चालकांअभावी ५० ते ५५ बसच धावत होत्या. वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने मोजक्याच बसचे संचालन सुरू होते. दरम्यान, २०१५ नंतरच्या १० व्होल्वो, १०८ जेएनएनयूआरएम आणि अन्य अशा १३८ बस चालवण्याचे उपक्रमाचे नियोजन आहे. यासाठी वार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटमध्ये चालक आणि वाहक कंत्राटाच्या वतीने उपलब्ध करून या बसमार्गावर चालवण्याचे उद्दिष्ट उपक्रमाने समोर ठेवले आहे. यात खर्चात प्रतिकिमी २० रुपये इतकी बचत होऊन बसचा ताफाही वाढण्याचा दावा करण्यात आला आहे. आजघडीला ७५ बससाठी वाहकसंख्या उपक्रमाकडे आहे, पण आता वाढीव बससाठी कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने प्रवासीसंख्या वाढून उपक्रमाचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास परिवहन समिती आणि व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.दुरुस्ती खर्चाच्या प्रस्तावाला स्थगितीजेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या विविध प्रकारच्या बसदुरुस्तीसाठी आवश्यक असलेले तातडीचे सुटे भाग, टायर्स, बॅटरी व उपक्रमासाठी इतर साहित्यखरेदीस व प्रत्यक्ष झालेल्या खर्चास तसेच बस, इतर वाहने व मशिनरीच्या सुट्या भागांसह दुरुस्तीस व खर्चास मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव व्यवस्थापनाने दाखल केला होता. पण, या एकूणच झालेल्या खर्चाबाबत योग्य प्रकारे माहिती न दिली गेल्याने हा प्रस्ताव सदस्यांकडून तूर्तास स्थगित ठेवण्यात आला. त्यात २०१७ ची बिले उशिराने का दाखल करण्यात आली, हा मुद्दाही सदस्य संजय मोरे यांनी उपस्थित केला. वारंवार दुरुस्तीच्या खर्चांना मान्यता देऊनही बस नादुरुस्त कशा होतात, असा सवाल करताना मे महिन्यात व्होल्वो बस रस्त्यावर धावणे अपेक्षित असताना त्या धावल्या नाहीत, याकडेही संजय राणे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, सदस्यांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत.बसथांबे जाहिरातबाजीसाठीच : बसथांब्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा सदस्य स्वप्नील काठे यांनी प्रस्ताव सूचनेद्वारे सभेत मांडला. बसथांब्यांवरील फ्लोअरिंग तुटलेले असून वरचे छत गळके असल्याने पावसाचे पाणी आतमध्ये येत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याकडे काठे यांनी लक्ष वेधले. या बसथांब्यांकडे व्यवस्थापनाचे पुरते दुर्लक्ष झाले असून थांबे केवळ जाहिरातींसाठीच उभे केले आहेत का, असा सवाल काठे यांनी केला. यावर, तातडीने सर्वेक्षण करून थांबे सुस्थितीत आणावेत, असे आदेश सभापती मनोज चौधरी यांनी व्यवस्थापनाला दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका