शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियम न मोडता दंडाची पावती येतेय घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:15 IST

वाहनधारकांनो सावधान; आरटीओंना तक्रार करण्याचे आवाहन

- पंकज रोडेकर ठाणे : तुम्ही गाडी खरेदी केल्यानंतर तुमच्याकडून वाहतुकीचे सर्व निर्णय काटेकोर पाळले जातात. पण, तरीसुद्धा तुम्हाला ई-चलनाद्वारे वाहतुकीचे नियम मोडल्याची एखादी दंडाची पावती घरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरा सावधान...! अशा दंडाची पावती घरपोच येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही भामट्यांनी ही शक्कल लढवली असून ते बनावट नंबरप्लेटचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. यासंदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रारीचे प्रमाण वाढल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी आरटीओने याबाबत कायदेशीररीत्या तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.ठाणे, मुंबई आणि इतर शहरांत ई-चलन ही प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे वाहतूक नियम धाब्यावर बसवल्यावर पोलीस संबंधित वाहनधारकांच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा फोटो काढत आहेत. त्यानुसार, त्याला दंडाची पावती घरपोच पाठवली जाते. या दंडाची रक्कम नियम मोडल्यावर वाढते. या दंडाच्या रकमेची झळ खिशाला बसू नये, यासाठी काही भामट्यांनी बनावट नंबरप्लेट आपल्या गाडीस वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यातून दंडाच्या पावतीसोबत आलेल्या फोटोत मूळ नंबरप्लेट असलेल्या मालकाला ती पावती गेल्यावर धक्का बसत आहे. त्यातून मी नियमच मोडला नाही. तरीसुद्धा मला दंडाची पावती आली कशी तसेच नंबरप्लेटवर नंबर आपल्याच गाडीचा आहे. पण, पाठवलेल्या फोटोमधील गाडी आपली नसल्याने ही पावती आलीच कशी, असा प्रश्नही त्यांना पडत आहे. याबाबत ठाणे आरटीओ कार्यालयात काही दिवसांत सात ते आठ जणांनी अर्जाद्वारे तक्रारी दिल्या आहेत. त्यात एका नेव्हीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यानेही वाहतुकीचे नियम न मोडताही त्याच्या घरी दंडाची पावती आल्याने आश्चर्य व्यक्त करून त्याने आरटीओ कार्यालयात धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यातच मूळ गाडीचा नंबर असलेल्या मालकाची आणि गाडीची माहिती आरटीओ विभागाकडून मिळू शकते. तसेच बनावट नंबरप्लेटधारकांचा शोध घेण्याचे काम हे पोलीस यंत्रणेचे आहे. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणेमध्यंतरी, उल्हासनगरमध्ये बनावट नंबरप्लेट लावलेली रिक्षा आढळून आली होती. असे प्रकार घडत असतील आणि त्याबाबत आरटीओ विभागाकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी याबाबत थेट पोलीस ठाण्यांमध्ये कायदेशीर तक्रार करावी. बनावट नंबरप्लेटचा वापर करणाऱ्यांवर निश्चित पोलीस यंत्रणा नियमानुसार कारवाई करेल. ’’ - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी