शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामधील बंड भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:49 IST

मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असे भाजपाने जाहीर केले खरे, पण पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असे भाजपाने जाहीर केले खरे, पण पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने आणि नाराजांनी समर्थकांसह निदर्शने सुरू केल्याने अखेर रात्री उशिरापर्यंत यादी प्रसिद्ध झाली नाही. ज्यांना गुपचूप आॅनलाइन भरण्याची सूचना दिली होती, त्यांनाही नंतर अडवण्यात आले. पक्षातील अस्वस्थता पराकोटीची असल्याने भाजपा नेतृत्वाचे धाबे दणाणले आहे.अर्ज बुधवारी दुपारपर्यंत भरायचे आहेत. त्यामुळे मंगळवारची रात्र उमेदवारांच्या निर्णयासाठी, अर्ज भरण्यासाठी मोलाची ठरणार आहे.पक्षाने केलेले सर्वेक्षण, आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेली शिफारस या आधारे ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती. तिला ते हिरवा कंदिल देतील अशी अपेक्षा होती. थेट उमेदवार निवडीपासून मेहता दूर असले तरी यादीवर त्यांचीच छाप आहे. त्यामुळे मेहता समर्थकांपैकी काहींनी आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरूवातही केली. उमेदवारांची रितसर यादी जाहीर होण्यापूर्वी त्यांना तशी सूचना देण्यात आली होती. याची कुणकुण लागताच त्या मतदारसंघातील बंडखोर संतापले आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. निदर्शने केली. हे बंडाचे लोण शहरभर पसरत जाईल, धास्तीपोटी लगोलग नवे निरोप देत काहींचे अर्ज भरणे थांबवण्यात आले.शिवसेनेतून भाजपात आलेले नगरसेवक प्रशांत दळवी यांना प्रभाग २० मधून रविवारी अर्ज भरण्यास सांगितल्याने त्यांनी अर्ज भरला. पण स्थानिक भाजपा नगरसेवक दिनेश जैन व त्यांचे कार्यकर्ते बंडाचा पवित्रा घेत आक्र मक झाले. त्यांना जैन समाजातील व्यक्तींनी पाठिंबा दिला. त्याचवेळी दिनेश जैन यांनी शिवसेनेत जाण्याच्या हालचाली सुरु केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. आधीच भाजपाच्या नगरसेविका दीप्ती भट शिवसेनेत गेल्या असताना जैनही गेल्यास प्रभाग २० चे पॅनल धोक्यात येण्याची शक्यता आहे. अखेर दिनेश यांना उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आणि प्रशांत दळवी यांना प्रभाग १८ देण्यात आल्याने ते नाराज झाले. उमेदवारी मिळूनही त्यांची कोडी झाली.भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग २ मधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात न आल्याने ते आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. भाजपाच्या नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनाही अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. परंतु त्यांचे वडील तथा ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना हिरवा कंदील दाखवल्याने त्यांनी अर्ज भरला. महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असून म्हात्रे या प्रमुख दावेदार मानल्या जातात. पण भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल मेहता यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत पुढे असल्याने उमेदवारीपासूनच म्हात्रे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे .भाजपाचे पाच वेळा नगरसेवक असलेले शरद पाटील यांनाही प्रभाग पाचमधून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. प्रभाग १४ मधून भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांना पण अर्ज भरण्यास सांगण्यात आले नसल्याने ते अस्वस्थ आहेत. या याशिवाय अनेक प्रभागातून विद्यमान नगरसेवकांना किंवा पक्षाने आधी ज्यांना आश्वासन दिले होते त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत काहीही न सांगितल्याने ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यातील काहींना पुन्हा सेनेत जाण्याचा पर्यायही शिल्लक नाही. त्यामुळे अन्य गट, आघाड्या किंवा अपक्ष म्हणून ते अर्ज भरण्याच्या स्थितीत आहेत.