शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर नगरसेवकांची आज सुनावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:01 IST

महापौर निवडणुकीतील फाटाफूट : राष्ट्रवादीमुळे अभय मिळणार?

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीत काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार पराभूत केल्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून आपल्यावर कारवाई होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांविरुद्धच्या अर्जाची मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यापुढे सुनावणी होत आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसमध्ये यामुळे ठिणगी पडण्याची शक्यता आहे. परिणामी, साऱ्यांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिषीका रांका यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या १८ फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी महापौर जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्तांकडे केली होती. कोकण आयुक्तांनी सुनावणीसाठी बंडखोर नगरसेवकांना बोलावले होते, त्यावेळी १८ पैकी फक्त पाच नगरसेवक हजर होते. विभागीय आयुक्त मिसाळ यांनी त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले. कागदपत्रे तपासणीस वेळ हवा असल्याची मागणी नगरसेवकांच्या वकिलांनी केल्यामुळे आयुक्तांनी ५ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

कोकण आयुक्तांकडे जबाब करणार सादरसर्व १८ नगरसेवक मंगळवारी कोकण आयुक्तांच्या कार्यालयात आपला जबाब व माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर या नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे. कारवाईच्या बडग्यातून सुटका व्हावी, याकरिता या १८ नगरसेवकांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश काँग्रेस वरिष्ठांच्या जिव्हारी लागला असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे कमालीचे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या नगरसेवकांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी