शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कारण समजल्याशिवाय विसर्जन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:43 IST

दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

- मुरलीधर भवार डोंबिवली : शहरातील प्रदूषणामुळे दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, गणेशमूर्ती काळी पडल्याने कार्यकर्ते व भक्त चक्रावून गेले आहेत. प्रसारमाध्यमांत वृत्त झळकताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केली. प्रदूषण आणि मूर्ती काळी पडण्याचा काहीच संबंध नाही. मूर्तिकाराने मूर्तीसाठी वापरलेले साहित्य व रंगात दोष असू शकतो. त्यामुळे मूर्ती काळी पडली असावी, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेचे अधिकारी येथे फिरकलेले नाहीत.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गले म्हणाले, दावडीच्या राजाची मोठी एक आणि दोन लहान मूर्ती काळ्या पडल्या आहेत. परंतु, रासायनिक कारखान्यांचा परिसर हा मंडळाच्या ठिकाणापासून एक ते दीड किलोमीटर दूर आहे. दावडीच्या राजाच्याजवळच एका मैदानात भगवान मित्र मंडळानेही मूर्तीची स्थापना केलीआहे. परंतु, त्यांच्या मूर्तीला काहीही झालेले नाही. दावडीचा राजा घडवणाºया मूर्तिकाराने त्याच परिसरात सात मूर्ती दिल्या असून त्यांच्यावरही परिणाम झालेला नाही. त्यामुळे प्रदूषणामुळे मूर्ती काळी पडली, याला आधार नाही. मूर्तिकाराने वापरलेले साहित्य व रंगात दोष असू शकतो.पर्यावरण दक्षता मंचाच्या प्रकल्प समन्वयिका रूपाली शाईवाले म्हणाल्या की, मूर्तीसाठी वापरलेले साहित्य व रंगांची प्रयोगशाळेत तपासणी केलेली नाही. त्यामुळे मूर्ती प्रदूषणामुळेच काळी पडली, असा ठाम निष्कर्ष काढता येत नाही. मूर्तिकाराने प्लास्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती घडवली आहे. त्यावर हवेतील प्रदूषणाचा परिणाम होत नाही. मात्र, रंगात लेड अथवा मर्क्युरी हे घटक असल्यास त्याचा परिणाम होऊन मूर्तीचा रंग बदलण्याची शक्यता आहे. दावडीतील अन्य मूर्ती काळवंडलेल्या नाहीत. त्या मूर्तीही काळ्या पडल्या असत्या, तर प्रदूषणाचा परिणाम झाला, असे म्हणण्यास वाव होता. प्रयोगशाळेतील चाचण्यांशिवाय असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.>सोनेचांदीचे दागिने काळे पडत आहेत. केवळ मूर्तीच काळी पडलेली नाही. प्रदूषणामुळेच हे होत आहे. - विद्या यादव,गृहिणी, दावडी

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव