शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतील एक हजार कुटुंबांना रेशनवरील धान्यपुरवठा पुन्हा सुरू

By अजित मांडके | Updated: October 24, 2023 13:29 IST

काही तांत्रिक कारणांमुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांच्या रेशनकार्डचे आधार सिडिंग झाले नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रेशनकार्डला आधारकार्ड सिडिंग न झाल्यामुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांचा आठ महिन्यांपासून बंद झालेला रेशनवरील धान्यपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. भाजपचे माजी  नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रहिवाशांना न्याय मिळवून दिला.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार, रेशनकार्ड व आधारकार्ड लिंक करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे कोपरीतील एक हजारांहून अधिक कुटुंबांच्या रेशनकार्डचे आधार सिडिंग झाले नव्हते. त्यामुळे आठ महिन्यांपासून सर्व कुटुंबांचे रेशनकार्ड अपात्र ठरून धान्यपुरवठा बंद झाला होता. त्याचा सामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांना फटका बसला होता. या रहिवाशांना नाईलाजाने बाजारपेठेतून महागड्या दराने धान्य घ्यावे लागत होते. त्यामुळे त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले होते. तसेच अनेक रहिवाशांना केंद्र व राज्य सरकारच्या मोफत धान्य योजनेचा फायदा घेता येत नव्हता.

या पार्श्वभूमीवर नागरिकांची व्यथा जाणून घेऊन भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे सचिव ओमकार चव्हाण यांनी ठाणे येथील शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण व शिधावाटप निरीक्षक संजय निनावे यांना निवेदन दिले होते. तसेच त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.अखेर या संदर्भातील सर्व त्रूटी दूर करण्यात येऊन, एक हजारांहून अधिक रहिवाशांची रेशनकार्ड पात्र करण्यात आली. तसेच या महिन्यापासून सर्वच्या सर्व एक हजार कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू करण्याचे निर्देश शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी दिले. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात धान्य मिळाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.