शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीला झुकते माप देणे राठोड यांना भोवले

By admin | Updated: December 4, 2015 00:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी २००८ ते २०१० या कालावधीत

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांना सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी २००८ ते २०१० या कालावधीत महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सांभाळला होता. त्या काळात एनआरसी कंपनीची जागा विक्रीसाठी ना-हरकत दाखला देणे आणि बीएसयूपीअंतर्गत बांधणाऱ्या कंत्राटदारांना झुकते माप दिल्याच्या कारणावरून त्यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीत आंबिवली, मोहने येथे असलेली एनआरसी कंपनी बंद पडली. आर्थिक कारण देऊन कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी घोषित केली. ती नोव्हेंबर २००९ साली झाली. त्या वेळी कामगारांनी मोर्चे, आंदोलने केली. तसेच थकीत देणी दिल्याशिवाय मालकाने कंपनीची जागा विकू नये, अशी मागणी केली होती. कंपनी व्यवस्थापनाने जागाविक्रीचे व्यवहार मुंबईतील एका बड्या बिल्डरकडे केले होते. त्याचे टोकनही घेतल्याची जोरदार चर्चा त्या वेळी होती. कंपनी महापालिकेकडे मालमत्ताकर भरत होती. जोपर्यंत कामगारांची थकीत देणी दिली जात नाही, तोपर्यंत कंपनी मालकास जागाविक्रीसाठी महापालिकेने ना-हरकत दाखला देऊ नये. असे असतानाही त्या वेळी आयुक्त राठोड यांनी कंपनीमालकास ना-हरकत दाखला दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. तसेच हे प्रकरण महापालिकेच्या महासभेत जून, जुलै महिन्यांत पार पडलेल्या महासभेत चर्चिले गेले होेते. तत्कालीन कामगारमंत्री नवाब मलिक व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाचीही त्यांनी पायमल्ली केल्याचा आरोप कामगारांनी केला होता. संबंधित वृत्त/२ एनआरसी कंपनीच्या ना-हरकत दाखल्यासोबतच केंद्र सरकारने महापालिका हद्दीत शहरी गरिबांसाठी असलेल्या बीएसयूपी घर योजनेसाठी १३ हजार ८८४ घरे बांधणार होती. या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदारांना देण्यात येणारा मोबिलाइज अ‍ॅडव्हान्स जास्त प्रमाणात दिल्याचा आरोप होता. या योजनेची चौकशी म्हाडा, तत्कालीन मुख्यमंत्री व आर्थिक गुन्हे शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या सगळ्या मुद्यांवर आधारित तत्कालीन उपमहापौर व सध्याचे विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात विविध मुद्दे त्यांनी मांडले होते. सरकारने त्यांच्या निलंबनाच्या कारणात पवार यांच्या याचिकेचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर राठोड काही काळ अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी होते. त्या ठिकाणीही काही कामात अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.