शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बदलापुरात रासप उघडणार खाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणी केली असून या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष ...

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणी केली असून या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष खाते उघडणार असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी केला आहे.

माघी गणेशोत्सव निमित्त अक्कीसागर यांनी नुकतेच बदलापुरातील स्टेशन पाडा माघी गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष चांगली कामगिरी करेल असा दावा केला. राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या चार वर्षांपासून पालिका निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली नियोजबद्ध तयारी केली आहे. लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी येणारे इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वाटपाचे फोटो काढत होते. मात्र थोरात यांनी असे फोटो काढणे कटाक्षाने टाळून अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणे हे कर्तव्य मानून मदतीचा हात दिला. याबद्दल त्यांनी थोरात यांचे विशेष कौतुक केले.

पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना राष्ट्रीय समाज पक्ष सोशल इंजिनिअरिंग पॅटर्न राबवणार असल्याचेही अक्कीसागर यांनी स्पष्ट केले. पक्षात सर्व समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना समान संधी मिळावी,असा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रासपचे किती उमेदवार निवडून येतील हे निकालानंतर स्पष्ट होईलच. परंतु या निवडणुकीत रासप खाते उघडणार हे मात्र नक्की,असा दावा त्यांनी केला.