शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावरून दिव्यात उद्या होणार राडा; खर्डी पुलावर होणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:44 IST

ठाणे महापालिकेच्या महासभेत कच-यावरून रणकंदन झाल्यानंतर १ जानेवारीपासून शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कच-याच्या गाड्या परतवण्याचे आंदोलन सुरू होणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत कच-यावरून रणकंदन झाल्यानंतर १ जानेवारीपासून शिवसेनेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कच-याच्या गाड्या परतवण्याचे आंदोलन सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खर्डी पुलावर जोरदार आंदोलन होणार आहे. त्यामुळे रोज निर्माण होणारा कचरा टाकायचा तरी कुठे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.ठाणे शहरातून गोळा झालेला ७५० मेट्रीक टन कचरा रोज दिव्यातील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. सध्या येथील कचरा साठवण्याची क्षमता संपली असतानाही ठामपाकडून पर्यायी व्यवस्था होत नसल्याने दिवावासीयांमध्ये नाराजी आहे. गेल्या काही महिन्यांत येथील कचºयाला अधूनमधून आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा धूर दिव्यात पसरून नागरिकांना अनेक शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. कचºयाच्या दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी महासभेत दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांनी आवाज उठवत नागरिकांना भेडसावणाºया त्रासाचा पाढाच वाचला होता. अधिकाºयांनी एक दिवस दिव्यात राहायला यावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. कचरागाड्या थांबवल्या नाहीत, तर १ जानेवारी रोजी दिव्यातील सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारी खर्डी येथील पुलावर शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन होणार आहे. यावेळी येथील नगरसेवक आणि शिवसैनिकांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतील. शीळफाटा येथील वनविभागाच्या खदाणीमध्ये डम्पिंग हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ठाण्यातून येणाºया कचरागाड्या थांबवून त्यांना परतवण्यात येणार असल्याने रोज शेकडो मेट्रीक टन निर्माण होणारा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.सत्ताधारीच करतात आंदोलनठाणे महापालिकेत शिवसेनेची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. डम्पिंगबाबत दिवेकरांच्या संतप्त भावना असतानाही डम्पिंग हलवण्याबाबत शिवसेनेने हालचाल केली नाही. सध्या डम्पिंगविरोधात शिवसेना नगरसेवक रस्त्यावर उतरले असून हा घरचा आहेर असल्याची टीका भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणे