शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

युरोपात आढळणारा दुर्मीळ कॉमन शेलडक्स चार वर्षांनी ठाणे खाडीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:49 IST

तीन पक्षी आढळले : पक्षीप्रेमी, छायाचित्रकारांसाठी आनंदाची बाब 

- स्नेहा पावसकरठाणे : ठाणे खाडीला फ्लेमिंगो सागरी अभयारण्य घोषित केल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पाहायला मिळतात. त्याचबरोबर, येथे अनेक दुर्मीळ पक्षीही दृष्टीस पडतात. सहसा युराेपात आढळणाऱ्या तर कधी भारताच्या पूर्व भागात आढळणारे दुर्मीळ कॉमन शेलडक्स (शाही चक्रवाक) हे दोन-तीन दिवसांपूर्वीच ठाणे खाडीत आढळले आहेत. २०१७ नंतर सुमारे चार वर्षांनी पहिल्यांदाच हे ठाणे खाडीत आढळल्याने पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब ठरली आहे.महाराष्ट्र शासनाने २०१५ साली ठाणे खाडी फ्लेमिंगो सागरी अभयारण्य घोषित केले व खऱ्या अर्थाने येथील लाखो पक्ष्यांना सुरक्षा व हक्काचे निवास स्थान प्राप्त झाले. नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येथे किमान २५ ते ४० हजार फ्लेमिंगो पाहता येतात व त्यांना पाहण्याकरिता पर्यटकांची रीघ लागते. यंदा कोरोनामुळे बंद केलेली पक्षी पर्यटकांची सफर पुन्हा सुरू केली आहे. ठाणे खाडीत स्थानिक आणि स्थलांतरित पाहुण्यांचीही नोंद होते. यातले अनेक पक्षी दुर्मीळ असतात. कॉमन शेलडक्स हाही एक दुर्मीळ. युरोपात आढळणाऱ्या या बदकाच्या प्रजातीतील पक्ष्यास क्वचित भारताच्या पूर्व प्रदेशातील गजलडोबा येथे पाहता येते, परंतु भारताच्या पश्चिम प्रदेशातील पाणथळ प्रदेशात याच्या फारशा नोंदी नाहीत. २०१७ला १५ दिवसांच्या ठाणे खाडीतील वास्तव्यानंतर मागील आठवड्यात कांदळवन विभागाचे उपसंचालक मानस मांजरेकर यांनी कॉमन शेलडक्सची नोंद केली.हा कॉमन शेलडक्स दुर्मीळ असून, पुढील १० ते १५ दिवस हे पाहुणे येथे दिसू शकतील, असा अंदाज आहे. कांदळवन विभागाचे वनाधिकारी कोकरे, उपजिल्हाधिकारी खुटवड, उपजिल्हाधिकारी कल्पना जगताप, कर्मचारी शाहिद बामणे यांच्यासह केलेल्या पक्षी निरीक्षणात तीन कॉमन शेलडक्स नजरेस पडले.- डॉ. सुधीर गायकवाड, वन्यजीव छायाचित्रकार