शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण स्थानकात बलात्कार

By admin | Updated: September 23, 2016 03:20 IST

लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर अनिल अवसरमोल याने कल्याण रेल्वेस्थानकावरील महिलांच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे

कल्याण : लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर अनिल अवसरमोल याने कल्याण रेल्वेस्थानकावरील महिलांच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पीडित मुलीवर पश्चिमेतील टावरीपाडा येथील घरीही अवसरमोल याने अत्याचार केला आहे. खडकपाडा पोलिसांनी मात्र दाखल झालेल्या तक्रारीवरून अवसरमोलविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कल्याण रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक २ वरील मुंबईच्या दिशेकडील शौचालयात २७ आॅगस्टच्या रात्री ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. या शौचालयाचा वापर होत नसल्याची माहिती मिळत आहे. परंतु, कल्याण स्थानकावर ही अत्याचाराची घटना घडल्याने तेथील एकंदरीतच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, हा प्रकार आपल्या हद्दीत घडलाच नाही, अशी भूमिका लोहमार्ग पोलिसांची असल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ‘लोकमत’ने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत राणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. दरम्यान, ३० आॅगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यानही अवसरमोल याने त्याच्या टावरीपाडा येथील घरीही पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीने खडकपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सा) अंतर्गत अवसरमोल याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.