शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दादोजीवर आता रणजी सामने

By admin | Updated: April 1, 2016 03:07 IST

शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामने खेळवण्यास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत, शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विकास

ठाणे : शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामने खेळवण्यास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत, शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विकास रेपाळे यांनी पाठपुरावा करून विशेष अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत हा मुद्दा लावून धरला होता. त्या विषयावर बोलताना पालिका आयुक्तांनी येत्या सर्वसाधारण सभेच्या आत या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच येत्या हंगामात रणजी सामने दादोजीवर खेळवण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून दादोजी स्टेडियम उभे राहिले. आज याच क्र ीडांगणातून अनेक उदयोन्मुख क्रि केटपटू घडत आहेत. तर, शहराने आजवर अनेक क्रि केटपटू मुंबई आणि देशाला दिले आहेत. २० वर्षांपूर्वी मुंबई आणि सौराष्ट्र हा सामना दादोजीवर खेळवला गेला. मात्र, त्यानंतर आजवर एकही सामना या स्टेडियमवर खेळवला गेला नाही, हे दुर्दैव आहे. रणजी सामने ठाण्यात खेळवले गेले तर अनेक नामवंत खेळाडूंचे कौशल्य ठाण्यातील क्रि केटपटूंना जवळून पाहता येईल, अनुभवता येईल. त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. मात्र, दादोजीची खेळपट्टी आणि तशा सुविधा येथे उपलब्ध नसल्याने रणजी सामने खेळवले जाऊ शकत नाहीत, असे संबंधितांचे म्हणणे आहे. यासाठीच दादोजी स्टेडियम राष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी ठाणे महापालिका प्रशासन आणि मुंबई क्रि केट असोसिएशनकडे आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे रेपाळे यांनी सांगितले. स्टेडियमच्या विकासाबरोबरच स्टेडियममध्ये इनडोअर क्रि केट कक्ष तयार करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. आजवर दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे आपण पांढरा हत्ती म्हणून पाहिले आहे. स्टेडियममध्ये रणजी/आयपीएलचे सामने व्हावेत, ही ठाणेकर क्र ीडाप्रेमींची इच्छा आहे. त्याकरिता, मैदानाची दुरवस्था दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातच स्टेडियम विकासाची फाइल बनवून तयार आहे. परंतु, आर्थिक तरतुदीअभावी काम होत नसल्याचे त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर शहरातील क्र ीडापटूंचे, युवकांचे तसेच क्र ीडा रसिकांचे आपण काहीतरी देणे लागतो, हे विसरून चालणार नाही आणि त्यासाठीच तातडीने हे प्रकरण मंजूर करावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर, आयुक्तांनी रणजी सामने खेळवण्याचे प्रयत्न राहिले, असे सांगितले. (प्रतिनिधी)