शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या शेवटच्या महासभेत रंगला माफी डे

By admin | Updated: March 19, 2017 05:40 IST

उल्हासनगर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह नगरसेवकांनी सर्वांची माफी मागत ‘माफी डे’ साजरा केला. कारण तसेच होते, महापालिकेच्या निवडणुका

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह नगरसेवकांनी सर्वांची माफी मागत ‘माफी डे’ साजरा केला. कारण तसेच होते, महापालिकेच्या निवडणुका झाल्या असल्या; तरी जुन्या नगरसेवकांचा कालावधी ५ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे नियमानुसार जुन्या नगरसेवकांची महासभा झाली. पण त्यात धोरणात्मक निर्णय घ्यायचे नसल्याने झाली ती आभाराची भाषणे. गेल्या पाच वर्षात घडलेल्या चुकांबद्दल माफी मागण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांन्त जणू स्पर्धा लागली आणि सॉरी, सॉरी म्हणत प्रत्येकाने झाले गेले विसरून जाण्याचे भावपूर्ण आवाहन केले. राज्यातील इतर नऊ महापालिकांसोबत उल्हासनगरची निवडणूक फेबु्रवारी महिन्यात पार पडली. ५ एप्रिलला महापौरांची निवड होणार आहे. तोवर जुन्याच नगरसेवकांचा कालावधी सुरू राहणार आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांची मार्च महिन्याची महासभा मावळत्या महापौर अपेक्षा पाटील यांनी बोलावली. जुन्या नगरसेवकांपैकी ४० टक्के नगरसेवक पराभूत झाले आहेत किंवा त्यांनी निवडणूक लढविलेली नाही. त्यांच्यासाठी ही महासभा अखेरची होती. त्यात महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार, नगरसेवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, बी. बी. मोरे, शिवसेनेचे नगरसेवक विजय सुफाळे, स्रेहा भोईर, काँग्रेसच्या पिंकी उदासी, भाजपाचे राम चार्ली आधींची ही शेवटची महासभा होती. महापालिका निवडणुका झाल्याने, जुन्या नगरसेवकांना महासभेत धोरणात्मक आणि आर्थिक महत्वाचे निर्णय घेता येत नसल्याचे परिपत्रक शासनाने काढले. त्यामुळे महासभेला उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी, महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार यांनी गेल्या पाच वर्षात आमच्याकडून कोणाचे मन दुखवले असेल, तर त्याबद्दल माफी मागितली. त्यात पालिका अधिकारी, सहकारी नगरसेवक, पत्रकार आणि नागरिकांचीही जाहीर माफी मागण्यात आली. महापौर अपेक्षा पाटील यांनी माझ्याकडून काही चुका होऊन कुणाची मने दुखावली असतील, तर मी माफी मागते, असे सांगत सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. उपमहापौर पंचशीला पवार माफी मागताना भावनिक झाल्या होत्या. गेल्या २० वर्षापासून राजकारणात असल्याने आणि महापालिकेच्या महासभा पाहात असल्याचे सांगून जनकल्याणासाठी असे सहकार्य यापुढेही करा, अशी विनंती त्यांनी केली. इतर नगरसेवकांनीही मग माफी मागण्याचा हा सिलसिला सुरू ठेवल्याने महासभेला ‘माफी डे’ चे स्वरूप आले. (प्रतिनिधी)कलानी, इदनानी, बोडारे यांची दांडीमहापालिकेच्या महासभेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेवकांनी दांडी मारली. यात आमदार आणि नगरसेवक ज्योती कलानी, ओमी कलानी, जया साधवानी, अंजली साळवे, माजी महापौर राजश्री चौधरी, सेनेचे सभागृह नेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, सुभाष मनसुलकर, साई पक्षाचे जीवन इदनानी, माजी महापौर आशा इदनानी, रिपाइंचे भगवान भालेराव, बसपाचे विजय तायडे, सुरेश जाधव, टोनी सिरवानी आदी नगरसेवकांचा समावेश होता.