शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील संगीत कट्ट्यावर रंगली पं. हरिप्रसाद चौरिसया यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधूर गाण्यांची मैफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 15:14 IST

पं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या संगीताचा कार्यक्र म अभिनय कट्ट्यावर आयोजित केलेल्या संगीत कट्ट्यावर संपन्न झाला.

ठळक मुद्देसंगीताचा बहारदार कार्यक्र म सादरपं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजनसंगीत कट्ट्याच्या माध्यमातून नवनवीन कालकारांना संधी देण्याचा प्रयत्न - किरण नाकती

ठाणे: अभिनय कट्ट्यावर पं. हरिप्रसाद चौरासीया यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त संगीताचा बहारदार कार्यक्र म सादर झाला. यात विनोद पवार, ज्ञानेश्वर मराठे, राजू पांचाळ, निशा पांचाळ, किरण म्हापसेकर, प्रणव कोळी, श्रेया वारे, सायली आंगणे या कलाकारांनी गाणी सादर केली.पं. हरिप्रसाद चौरिसया यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील संगीत कट्ट्यावर त्यांच्या गाण्यांचे आयोजन केले होते. या कार्यक्र मात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांतील सुप्रसिद्ध गाणी सादर करण्यात आली. १ जुलै १९३८ साली चौरासीया यांनी एका सर्व सामान्य घरात जन्म घेतला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. वडील पैलवान असल्याने मुलाने देखील पैलवानच व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र गाण्यात मन रमत असल्याने त्यांनी गाण्याकडेच आपले लक्ष केंद्रित केले. पुढे त्यांनी पंडित भोलानाथ यांच्याकडे बासरी वाजनाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी यशस्वीरित्या वाटचाल केली. चांदनी, सिलिसला, डर, लम्हे, फासले, साहिबां, परंपरा यांसारख्या सुपरहिट सिनेमांना त्यांनी संगीत दिले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्यांनी गुरु शिष्य परंपरा जोपासत वर्सोवा येथील आपल्या राहत्या घरी वृंदावन गुरु कुल हा उपक्र म सुरू केला आहे. यावेळी कट्ट्याच्या कलाकारांनी ‘तेरे मेरे ओठो पे’, ‘मेरे हाथो मे नौ नौ चुडिया है’, ‘जादू तेरी नजर’ तसेच ‘रंग बरसे...’ अशी अनेक चौरासीया यांची गाणी गायली. संगीत कट्ट्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी तेथे गर्दी केली होती. विनोद पवार, ज्ञानेश्वर मराठे, राजू पांचाळ, निशा पांचाळ, किरण म्हापसेकर, प्रणव कोळी, श्रेया पवार, सायली आंगणे या कलाकारांनी गाणी सादर केली. कट्ट्याचे निवेदन सहदेव कोळंबकर तर दीपप्रज्वलन वनिता कांबळे यांनी केले. कट्ट्याच्या माध्यमातून नवनवीन कालकारांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही संगीत कट्ट्यामार्फत करत आहोत असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले. संगीत कट्ट्याचे आयोजन किरण नाकती व अभिनय कट्ट्याच्या सर्व कलाकारांनी केले

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई