शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

By admin | Updated: January 9, 2016 02:10 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने थांबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा सुरु असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण रेल्वे स्थानक परिसराच्या रुंदीकरणाला व विकासाला आयुक्त ई रवींद्रन यांनी विशेष प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यास शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ झाला. कडक पोलीस बंदोबस्त याकरिता तैनात केला होता. कारण या कारवाईला व्यापाऱ्यांनी सक्त विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता धावून आले होते व त्यांनी अशी कारवाई होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक दुपारनंतर पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला व कारवाई थांबली. कारवाई थांबली असली तरी ८० टक्के पाडकाम झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून काही बांधकाम पाडण्याची तयारी दाखवल्याने कारवाई थांबली, असा दावा व्यापाऱ्यांनी केला.इमारती, दुकाने अशा ३१२ जणांना त्यांचे बांधकाम पाडून टाकण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यात मोठया प्रमाणावर व्यापाऱ्यांची बांधकामे होती. त्यांनी हे रूंदीकरण थांबावे म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवली आणि निषेध प्रकट केला. त्याचवेळी मंत्री मेहता हे व्यापाऱ्यांना भेट द्यायला आले. स्मार्ट सिटी लोकांकरिता आहे की, अधिकाऱ्यांकरिता असा सवाल मेहता यांनी करीत. कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.आयुक्त रवींद्रन हे कारवाईवर ठाम होते. त्यांनी दबावाला बळी न पडता शुक्रवारी सकाळपासूनच ४ जेसीबी, ३ पोकलेन, २०० पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी, आठ प्रभागक्षेत्र अधिकारी असा मोठा फौजफाटा कारवाईसाठी तैनात केला होता. व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप करु नये याकरिता शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई होणारच हे स्पष्ट झाल्याने काही व्यापाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपासूनच आपली वाढीव बांधकामे स्वत:हून पाडण्यास सुरूवात केली होती. आम्हाला रुंद रस्ते हवे अशी भूमिका पादचारी व वाहन चालक यांनी घेत आयुक्तांच्या या कारवाईचे कौतुक केले. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास कारवाई थांबविण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्त रवींद्रन यांना दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा आहे. नगरविकास व गृह ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांच्या कार्यालयाखेरीज हे घडले नाही, असे बोलले जाते. प्रकाश मेहता यांनी कल्याणमधील कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ती थांबली, असेही बोलले जाते.