शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एलईडी’च्या निविदेतून उधळपट्टी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:14 IST

स्मार्ट सिटी योजना : निविदेस स्थगिती देण्याची नगरसेवकाची मागणी

कल्याण : केडीएमसी हद्दीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत बसवलेले पथदिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे लावण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निविदा मागवण्यात आली आहे. ही निविदा नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारी असल्याने त्याला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना नगरसेवकाने केली आहे.

महापालिका हद्दीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत तसेच नव्याने विकसित झालेल्या ठिकाणी सहा हजार २५२ पथदिवे बसवले आहेत. या पथदिव्यांचा अहवाल स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यास दिला आहे. मात्र, स्मार्ट सिटीत एलईडी पथदिवे बसविताना यापूर्वी लावलेल्या दिव्यांची संख्या वगळून अन्य ठिकाणी लावण्यात येणाºया पथदिव्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे अपेक्षित होते. परंतु, आधी लावलेले पथदिवे न वगळता त्यांच्यासह स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

राज्य सरकार व महापालिका निधीतून लावलेल्या पथ दिव्यांना लावून दोन ते सहा वर्षे झालेली आहेत. ते बदलून नवे एलईडी दिवे लावण्याचा घाट स्मार्ट सिटीअंतर्गत घातला गेला आहे. त्यासाठी निविदा मागवली आहे. त्यामुळे आधी खर्च केलेला निधी वाया जाणार असल्याने हे नागरिकांचे आणि महापालिकेचे नुकसान आहे.

स्मार्ट सिटीतर्फे नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर १६० एलईडी दिवे बसवून त्यांची कार्यक्षमता सहा महिने कालावधीसाठी तपासली जाणार होती. या दिव्यांची कार्यक्षमता उत्तम असल्याचे आढळल्यास त्याचा विचार केला जाईल, असे म्हटले होते. मात्र, या दिव्यांतून चांगला प्रकाश मिळत आहे. असे असताना हे दिवे बदलण्याचे स्मार्ट प्रयोजन काय, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांनी केला आहे. एलईडी दिव्यांच्या निविदेस स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर या दिव्यांतून ५० टक्के वीजबचत होणार असल्याचा दावा केला जात असला, तरी त्याद्वारे वीजबचत झाली नाही तर संबंधित कंत्राटदाराकडून त्याची वसुली करून त्याच्याविरोधात काय कारवाई केली जाईल, याचा उल्लेख निविदेत दिसून येत नाही, याकडे बासरे यांनी लक्ष वेधले आहे.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक अद्याप झालेली नाही. महापालिका आयुक्त गोविंद बोडके हे मसुरी येथे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्याचबरोबर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक जानेवारीत होणे अपेक्षित आहे.कामांना गती मिळणार कधी?च् कल्याण स्टेशन परिसर विकासाची निविदा नव्याने मागविली आहे. त्यावर विचारविनिमय होऊ घातलेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत अपेक्षित आहे.च् स्मार्ट सिटीसाठी महापालिकेची २०१६ मध्ये निवड झाली. तेव्हापासून महापालिका प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, कंपनी स्थापन करणे, संचालक मंडळ नेमणे, कर्मचारी व अधिकारी नेमणे आणि बैठका घेणे हे काम सुरू आहे.च् विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गती दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, स्मार्ट सिटीचे काम पुन्हा रेंगाळलेले दिसून येत आहे.च्स्मार्ट सिटीअंतर्गत घेतलेल्या सिटी पार्कच्या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, त्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. अजूनही त्याला मिळालेली गती दिसून येत नाही.