शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

रामदास खरात यांनी पटकावला मास्टर्स स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाचा किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:03 IST

ठाणे ग्रामीण पोलिसांचे यश; राष्ट्रीय स्पर्धेत पोलीस व्यायामशाळेच्या चौघांना सुवर्णपदक

ठाणे : नागपूर, वाशीम येथे १३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर व मास्टर्स स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस व्यायामशाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये चार जणांनी सुवर्णपदक जिंकले. या व्यायामशाळेचे प्रशिक्षक आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास खरात यांनी मास्टर्स स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया २०१९ चा किताब पटकावला असून राष्ट्रीय स्तरावर त्यांनी चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे.भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेने राष्ट्रीय ज्युनिअर व मास्टर्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातून १९ राज्यांतून २४३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस व्यायामशाळेचे पोलीस हवालदार गोपाळ बरखडे, दत्तात्रेय कटकधोंड, महेश बासूतकर, रवींद्र चव्हाण तसेच व्यायामशाळेचे प्रशिक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास खरात यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धामध्ये रामदास खरात यांनी ९७ किलो वजनी गटात ७०० किलो वजन उचलून मास्टर्स स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया २०१९ चा किताब पटकावला आहे. खरात यांनी आजपर्यंत दोनदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत खेळाडू पुरस्कार असे शासनाचे पुरस्कार प्राप्त केले असून त्यांना महाराष्ट्रीच्या पोलीसपदकानेदेखील सन्मानित केले आहे. २४ ते २७ डिसेंबरदरम्यान जमशेदपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता खरात यांची निवड झाली.