शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:14 IST

दरवर्षी उन्हाळी सुट्टीत परिवारासह कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी बस सोडण्याबाबत पत्रव्यवहार करूनही चालक, वाहक, बसगाड्या नाहीत

जान्हवी मोर्ये डोंबिवली : दरवर्षी उन्हाळी सुट्टीत परिवारासह कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी बस सोडण्याबाबत पत्रव्यवहार करूनही चालक, वाहक, बसगाड्या नाहीत, असे सांगत कणकवलीहून विठ्ठलवाडीपर्यंत परतीच्या प्रवासासाठी गाड्या सोडण्यात न आल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. खाजगी गाड्यांचे बुकिंग झाल्यानंतर एक गाडी सोडण्यात आली आणि ती पुरेशा प्रतिसादाअभावी बंद करण्यात आली. आताही शाळा सुरू होण्याआधी परतीच्या प्रवासासाठी गाड्या सोडण्याची मागणी केली असली, तरी एसटीने त्याची दखल न घेतल्याने भोंगळ कारभार पुन्हा उघड आला आहे.कोकण प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के म्हणाले, संघटनेच्या शिष्टमंडळाने एस.टी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो यांची ११ एप्रिल ला भेट घेतली असता सध्या एस.टी महामंडळाकडे चालक, वाहक व बसगाडयांची कमतरता आहे. त्यामुळे जास्त लांब पल्ल्यांच्या गाड्यांची मागणी करू नका, असे सांगण्यात आले. कोकण प्रवासी संघटनेने जानेवारी २०१८ मध्ये महामंडळांकडे कल्याण व विठ्ठलवाडी आगारातून सावंतवाडी, मालवण, देवगड, कणकवली, रत्नागिरी, गुहागर, चिंद्रावळे (गराटेवाडी), दापोली व अलिबाग मार्गावर उन्हाळी सुट्टीत जादा हंगामी बसेस सोडण्याबाबत पत्र दिले होते. कुर्ला येथील विद्याविहार कार्यालयात उपव्यवस्थापक यांच्या झालेल्या बैठकीत विठ्ठलवाडी आगारातून चिपळूण, गुहागर व गराटेवाडी तसेच कणकवली आगारातून विठ्ठलवाडी आगारापर्यंत व रत्नागिरी आगारातून विठ्ठलवाडी आगारापर्यंत आणि दापोली आगारातून विठ्ठलवाडी पर्यंत रातराणी बसेस १८ एप्रिल पासून सुरू करण्याचे आश्वासन उपमहाव्यवस्थापक राहूल तोरो यांनी दिले. त्याबाबत मार्गावरील विभाग नियंत्रक यांना दुरध्वनीवरून आदेश दिले. विठ्ठलवाडी , रत्नागिरी व दापोली आगारातून उपमहा व्यवस्थापकांच्या आदेशाने वरील मार्गावर जादा बसेस सुरू केल्या. मात्र सिंधुदुर्ग विभागाने कणकवली ते विठ्ठलवाडी बससेवा सुरू करण्यास टंगळमंगळ क रीत होते. सतत १५ दिवस उपमहाव्यवस्थापक व सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक व आगारप्रमुख यांना फोनवर संपर्क संघटना साधत होती. अखेर २८ एप्रिल पासून मालवण आगारातर्फे विठ्ठलवाडी पर्यंत बस वाहतूक सुरू केली. मात्र अचानक बस सुरू झाल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभला नाही. प्रवाशांनी एक महिना आधीच खाजगी गाडयांचे बुकिंग केले होते. त्यामुळे मालवण ते विठ्ठलवाडी बससेवा बंद करण्यात आली. ही बससेवा १ मे पासून सुरू करू न त्यासाठी ११ एप्रिलपासून आरक्षण सुरू केले असते तर प्रवासी मिळून महामंडळाला त्यातून चांगले उत्पन्न मिळाले असते. दरवर्षी या बसेस विठ्ठलवाडी व कल्याण आगारातून सोडल्या जातात. मात्र चालक, वाहक व बसगाडयांची कमतरता असल्यामुळे गतवर्षापासून कणकवली, रत्नागिरी व दापोली आगाराचे सहकार्य मिळते. तेथील विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व वरिष्ठ आगारप्रमुख नेहमीच्या प्रवाश्यांच्या सोयीचा व महामंडळाला उत्पन्न कसे मिळेल हा दृष्टीकोन डोळ््यासमोर ठेवून वाहतूक चालविली जाते. मात्र यावर्षी दुर्लक्ष केले. निदान १ जून ते १५ जूनपर्यंत सेवा सुरू केल्यास परतीच्या प्रवाश्यांना त्यांचा फायदा होईल. ही सेवा सुरू करून परतीच्या प्रवाश्यांची सोय करावी असे शिर्के यांनी सांगितले आहे.