शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या ‘सुरक्षे’साठी रिक्षांच्या परवाने जप्तीची सक्ती!

By admin | Updated: January 10, 2017 06:45 IST

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त साकेत मैदानावर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये

ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त साकेत मैदानावर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये आॅटोरिक्षाचालकांनी हजर राहावे, यासाठी त्यांचे वाहन चालवण्याचे परवाने पोलिसांनी अगोदरच जमा केले होते. पोलिसांच्या या अभिनव सक्तीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला. परंतु, त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसलेल्या आॅटोचालकांनी नाराजी व्यक्त केली.भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल रावदेव यांच्या उपस्थितीत माझी रिक्षा, माझी दीक्षा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी १ वाजताची असली तरी आॅटोचालकांना १२ वाजताच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी हजर राहावे, याचे नियोजन वाहतूक शाखेने अगोदरच केले होते. केवळ तोंडी सांगून आॅटोचालक कार्यक्रमाला येणार नाहीत, हे वाहतूक पोलिसांनी हेरले होते. त्यावर उपाय म्हणून त्यांचे परवाने स्वत:च्या ताब्यात घेण्याचा कार्यक्रम वाहतूक पोलीस गेल्या काही दिवसांपासून राबवत होते. कार्यक्रमाला या आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर परवाने घेऊन जा, असे त्यांना बजावण्यात आले होते. परवाने जमा करण्याचा हा कार्यक्रम किती प्रामाणिकपणे राबवण्यात आला, हे आॅटोचालकांच्या उपस्थितीवरून दिसून आले. कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप आॅटोचालकांनी हाऊसफुल्ल झाला होता. जवळपास २०० चालक कार्यक्रमासाठी रिक्षा घेऊन हजर होते. कार्यक्रम आॅटोरिक्षाचालकांच्या हिताचाच होता. सामान्य नागरिकांना आॅटोरिक्षाचालकांकडून बरेचदा चांगले अनुभव येत नाहीत. जवळच्या भाड्यासाठी नकार देणे, शहराची माहिती नसलेल्या प्रवाशांना जाणीवपूर्वक लांबच्या रस्त्याने नेणे, रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा भाडे उकळणे, असे प्रकार नेहमीच घडतात. वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात आघाडीवर कोण, या प्रश्नावर मत जाणूस घेतल्यास सर्वाधिक ठाणेकर आॅटोचालकांनाच दोष देतील, यात शंका नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून आॅटोचालकांचे वेळोवेळी प्रबोधन होणे अत्यावश्यक असते, यातही शंका नाही. कार्यक्रमासाठी त्यांचे परवाने जमा करण्यामागे वाहतूक पोलिसांचा उद्देश वाईट नव्हता, हेही खरे. परंतु, असे कार्यक्रम प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरतात, हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा आहे. (प्रतिनिधी)