शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज यांची सभा ‘गडकरी’समोर, आग्रह सोडला : ठाणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी निवडला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:12 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली असून गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोड या ठिकाणी ती होणार आहे.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली असून गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोड या ठिकाणी ती होणार आहे. अशोक टॉकीजजवळ होणारी सभा ठाणेकरांच्या सोयीसाठी बदलण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.येत्या शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी राज यांची सभा होणार असून ठाण्यातील पदाधिकाºयांकडून परवानगी व जागेकरिता धावपळ सुरू होती. सेंट्रल मैदान, तलावपाळी, अशोक टॉकीज जवळच्या जागा सभेसाठी पाहिल्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलीस परवानगी देण्यास का-कू करित असल्याचे पाहिल्यावर सोमवारी पक्षाच्या पदाधिकाºयांनी अशोक टॉकीज परिसरात सभा होण्याचे जाहीर केले. मंगळवारी मनसे नेते बाळा नांदगावकर ठाण्यात सभेची जागा पाहण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी मनसे उपाध्यक्ष अभिजीत पानसे, ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव हेही उपस्थित होते. पोलिसांशी झालेल्या चर्चेअंती अखेर गडकरी रंगायतन समोरील डॉ. मूस रोडची जागा निश्चित करण्यात आली.अशोक टॉकीज परिसरात सभा घेतल्यास स्टेशनवरुन येणाºया लोकांना अडथळा होऊ शकतो, असे पोलिसांचे मत असल्याने ती जागा बदलण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. जागा निश्चित झाल्याने पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या असून सभेचे होर्डींग्ज लावले जाणार आहेत, सोशल मीडियावरही सभेची प्रसिद्धी केली जाणार असून पथनाट्याच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले जाणार आहे.दुपारी मी तलावपाळी, अशोक टॉकीज आणि गडकरी रंगायतन समोरील जागांची पाहणी केली. यात गडकरी रंगायतनच्या समोरील जागा अत्यंत उत्तम वाटते. अशोक टॉकीजजवळ रहदारी असते. तेथे सभा घेतल्यास रहदारीला त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे जागा बदलली. जागा निश्चित झाल्यावर ताबडतोब राज ठाकरेंना कळवले. उपायुक्त स्वामी आणि उपायुक्त काळे यांच्याशी चर्चा करुन सभेची जागा निश्चित केली. - बाळा नांदगावकर, मनसे नेते३० ते ३५ हजार नागरिक या सभेला हजर राहतील, अशी मनसे पदाधिकाºयांची अपेक्षा आहे. लोकांची गर्दी वाढल्याने जागा कमी पडल्यास बाजूचा रस्ताही घेण्याचा विचार आहे, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणेhawkersफेरीवाले