शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर जामिनावर झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:21 IST

बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली.

ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली. मात्र, त्यांनी कारागृहामध्येही हेरगिरी सुरूच ठेवली. कैद्यांचे हाल, त्यांचे उपेक्षित आयुष्य आणि त्यामागची कारणे रजनी यांनी तपासली असून, त्या लवकरच यावर पुस्तकही लिहिणार आहेत.सीडीआर प्रकरणात ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २ फेब्रुवारीला रजनी पंडित यांना अटक केली होती. जवळपास ४० दिवस त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी २० हजारांच्या जात मुचलक्यावर सोमवारी त्यांचा जामीन मंजूर केला. सकाळी १० च्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.कारागृहात भल्या-भल्यांचा धीर खचतो. रजनी पंडित मात्र त्याला अपवाद ठरल्या. या काळात त्यांनी महिला कैद्यांचे समुपदेशन केले. महिला कैद्यांच्या मदतीसाठी कुणीच पोहोचत नाही. प्रसारमाध्यमांकडे किंवा अन्य कुणाकडे काही बोलल्यास त्याचा परिणाम खटल्यावर होईल, अशी भीती कैद्यांना दाखविली जाते. त्यामुळे अनेक कैदी नैराश्याच्या गर्तेत सापडले असल्याचे पंडित यांनी सांगितले. सीडीआर प्रकरणाबाबत बोलताना, त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. मानसिकदृष्ट्या खचलेल्या कैद्यांचे समुपदेशन करून हा काळही आपण सत्कारणी लावला, असेही त्या म्हणाल्या.>सत्य शोधून काढणारसीडीआर प्रकरणात आपणास का गोवण्यात आले, याचे सत्य शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जवळपास ३0 वर्षांपासून खासगी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या रजनी पंडित यांनी दिला. शेवटी मी एक गुप्तहेर आहे. अनेक प्रकरणांचा छडा मी आजवर लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाचाही तळ गाठून सत्य शोधून काढू, असे पंडित यांनी सांगितले.