शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राजन विचारेंना हितशत्रूंचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:30 IST

पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी; राष्ट्रवादीचा थांगपत्ता नाही; काँग्रेसची अवस्थाही बिकटच

- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात युतीच्या नगरसेवकांची संख्या ३२ असून राष्ट्रवादीचा येथे भोपळा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला येथे मोठे आव्हान असणार आहे. या मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकछत्री अंमल असल्याने विचारेंसाठी ही जमेची बाजू असली, तरी अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविरोधात खदखद असल्याचेही बोलले जात आहे. ही खदखद मतदानातून दिसली, तर त्याचा फटका विचारेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, शिवसेनेत आदेश महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आदेश आला तरच त्यासाठी काम केले जाईल, असेही येथील शिवसेनेचे पदाधिकारी खाजगीत बोलत आहेत.ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून युती झाली असल्याने शिवसेनेचे राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मागील निवडणुकीत विचारे यांना मोदीलाटेमुळे पाच लाख ९५ हजार ३६४ मते, तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नाईक यांना विचारेंच्या तुलनेत नगण्य मते पडली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात झाला होता. त्यावेळी भाजपाच्या संदीप लेले यांनी जोरदार प्रचार केला होता. परंतु, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची या पट्ट्यातील ताकद पाहता, त्यांचा प्रभाव कामी आला नव्हता. त्यानुसार, यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना तब्बल एक लाख ३१६ मते, तर भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजार ४४७ मते मिळाली होती.कॉंग्रेसचे मोहन गोस्वामी यांना १७ हजार ८७३ मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार बिपिन महाले यांना एकूण मतदानाच्या अवघ्या दीड टक्कयाच्या आसपास म्हणजेच दोन हजार ५६५ मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे या मतदारसंघात पानिपत झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर, झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे येथे उरलेसुरले नगरसेवकसुद्धा शिवसेना आणि भाजपामध्ये डेरेदाखल झाल्याने राष्ट्रवादीसोबतच कॉंग्रेसलाही याठिकाणी भोपळासुद्धा फोडता आला नाही. कॉंग्रेसचे मनोज शिंदे यांचासुद्धा यावेळी प्रथमच पराभव झाला होता. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ३२, तर भाजपाचे चार नगरसेवक विजयी झाले आहेत. याशिवाय, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वजन पाहता, या सर्वांचा फायदा विचारे यांना होण्याची शक्यता आहे.शिवसेनेत स्थानिक पातळीवर असलेली नाराजी विचारेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. येथील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी विचारे यांच्या कामकाजावरून नाराज असल्याचे कार्यकर्ते दबक्या आवाजात सांगतात. गॅस पाइपलाइनचे काम त्यांच्या माध्यमातून झाले असले, तरी तेसुद्धा अर्धवट आहे. कोपरी पोस्ट आॅफिसचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु, आजही अनेक प्रश्न सुटले नसल्याने, विचारे यांच्यावर येथील पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.राजकीय घडामोडीविधानसभा निवडणुकीत संदीप लेले यांनी एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.अनेकांचा शिवसेना-भाजपात प्रवेश : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोपरी भागातील कॉंग्रेस आणि राष्टÑवादीच्या विद्यमान भरत चव्हाण, मालती पाटील, लक्ष्मण टिकमानी, संजय घाडीगावकर आदींसह इतर आजीमाजी नगरसेवकांनी शिवसेना व भाजपामध्ये प्रवेश केल्याने येथे युतीसाठी पोषक वातावरण आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक